धुम्रपानामुळे कोरोनाचा धोका कमी होत नाही

धुम्रपानामुळे कोरोनाचा धोका कमी होत नाही

धुम्रपानामुळे कोरोनाचा धोका कमी होत नाही फेब्रुवारी व मार्च महिन्यात केलेल्या एका अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला कि धुम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा धोका व त्यामुळे मृत्यूची शक्यता कमी आहे. पण नंतर या अभ्यासाच्या त्रुटी लक्षात आल्या. व जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हणण्यास अजून कुठला ही संशोधनात्मक आधार नसल्याचे जाहीर केले. तसेच धुम्रपानामुळे कोरोनाचा धोका कमी होत नाही असे जाहीर केले.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

फ्रांसच्या माध्यमांमध्ये सुरुवतीला या बातम्या आल्याने धूम्रपानाचे प्रमाण वाढले पण नंतर तिथे ही वैद्यकीय तज्ञांनी हा अभ्यस अपूर्ण असल्याचे सांगितले. एक तर या अभ्यासात केवळ ४८२ जणांचाच अभ्यास केला होती. ठामपणे निष्कर्ष काढण्यास ही संख्या कमी आहे. तसेच यात सामील असलेल्यांनी आधी धुम्रपान सोडले आहे अशांची ही बरे झालेल्यांमध्ये गणना करण्यात आली. तसेच प्रत्येक वैद्यकीय संशोधनात्मक अभ्यासाचे इतर संशोधक आणि तज्ञांकडून पडताळणी करूनच तो निश्चित मानला जातो. अजून या अभ्यासाची अशी कुठलीही पडताळणी झाली नसताना तो अति उत्साहात फ्रांसच्या माध्यमात छापण्यात आला. तिथून तो जग भर पसरला . पण कोणीही या भ्रमात राहू नये. उलट धुम्रपान करत असलेल्याल्यांना फुफ्फुसाला इजा झाल्यामुळे  कोरोनच नव्हे तर इतर कुठल्या ही जंतुसंसर्गाचा धोका जास्त असतो. तसेच मधुमेह , ह्र्दयरोग, फुफ्फुसाचा कॅन्सर या सर्वांचा धोका जास्त असल्याने कोरोना झाल्यास मृत्यूचा धोका जास्त असू शकतो. म्हणूनच मद्यपाना प्रमाणे कोरोना ही धुम्रपान सोडण्यास चांगली संधी आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता