मद्यपान सोडण्यासाठी चांगले निमित्त लॉकडाऊनच्या काळात मद्य उपलब्ध नसल्याने अनेकांवर सक्तीची व्यसनमुक्ती लादली गेली. यामुळे मद्य सोडल्या नंतर काही प्रमाणात या नंतरची शारीरीक व मानसिक लक्षणांचे ( वीड्रॉवल ) रुग्ण वाढले आहेत. पण या निमित्ताने आपण मद्या शिवाय राहू शकतो हा आत्मविश्वास बाळगून इथूनच व्यसनमुक्तीला सुरुवात करा. मद्य सोडण्याचे अजून एक कारण म्हणजे मद्य प्राशनामुळे शरीरात जीवन सत्वांची कमतरता निर्माण होते व त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणून असे अप्रत्यक्षपणे म्हणता येईल की मद्यप्राशन तुम्हाला कोरोनाच्या संसर्गाची शक्यता वाढवू शकतो.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
मद्यपान सोडण्यासाठी चांगले निमित्त मद्यप्राशन सोडल्यावर पुढील लक्षणे जाणवू शकतात – थरथरणे , झोप न लागणे, वाईट स्वप्न पडणे, बेचैन होणे, निराश वाटणे, रोजची ठरलेली मद्यप्राशनाची वेळ झाली कि बेचैनी वाढणे.
घरचे सदस्य यासाठी अशा व्यक्तीला मद्य देण्याचा प्रयत्न करतात. पण अशा लक्षणांवर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेऊ शकता. याशिवाय घरी पुढील गोष्टी करता येतील –
- भरपूर पाणी प्या ( दिवसाला ६ ते ८ लिटर ) यापैकी – एक ग्लास पाण्यामध्ये चिमुटभर मीठ, १ चमचा साखर आणि अर्धे लिंबू – असे सकाळी व रात्री दोन ग्लास घ्या.
- रोज एक तास व्यायाम करा.
- कोणाशी तरी बोलून आपल्या भावना व्यक्त करा.
- काय वाटते ते लिहिणे, चित्र काढणे, शांत संगीत ऐकणे अशा आनंददायक गोष्टी करा.
- रोजच्या मद्य पिण्याच्या वेळेला काही तरी नवे वेळापत्रक बनवून ते करा व त्यावेळी फोन वरून जवळच्या मित्राची किंवा घरच्या सदस्याची मदत घ्या.
यानिमित्ताने मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने आपण तीन महिने जरी उपचार व समुपदेशन घेतले तरी मद्यपान सुटू शकते. प्रत्येक गावामध्ये या साठी अल्कोहोलीक अॅनॉनीमस हा मोफत काम करणारा स्वयंसेवकांचा समूह कार्यरत असतो. तो शोधून तुम्ही या साठी त्यांची मोफत मदत घेऊ शकता.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता