Articles

सर्दी-खोकला-ताप म्हणजे कोरोना नाही

By Admin

March 17, 2020

सर्दी-खोकला-ताप म्हणजे कोरोना नाही

सर्दी खोकला किंवा इतर कुठल्याही कारणाने ताप आला तर कोरोनामुळे आहे का अशी भीती आपल्याला प्रत्येकाला वाटणे सहाजिक आहे. पण कोरोनाची मुख्य लक्षणे समजून घेतल्यास लक्षात येईल की साधा सर्दी-खोकला म्हणजे कोरोना नाही.

प्रत्येक सर्दी-खोकला-ताप म्हणजे कोरोना नाही

कोरोना व्हायरस (COVID-19) ची मुख्य लक्षणे –

कोरडा खोकला, तीव्र स्वरुपाचा ताप त्यानंतर दोन किंवा तीन दिवसांनी श्वास घेण्यास त्रास . यासोबत 1 जानेवारी नंतर कोरोनाग्रस्त देशांमध्ये प्रवास किंवा सध्या भारतातील कोरोनाचे निदान निश्चित झालेल्या रुग्णांची संबंध हा रिस्क फॅक्टर महत्त्वाचा आहे. ताप आणि खोकला  इतर कारणांनी असू शकतो. पण कोरोनाग्रस्तांशी संबंध आल्यास व ही लक्षणे असल्यास मात्र आपण सरकारी यंत्रणेशी तपासणी साठी संपर्क साधायला हवा. अंगदुखी ही कोरोनामध्ये कमी प्रमाणात सर्दी खोकला, फ्लू मध्ये जास्त प्रमाणात असतात तसेच शिंका येणे, नाक गळणे, जुलाब हे कोरोनामध्ये नसते पण  सर्दी खोकला व फ्लू मध्ये असते.

कोरोना व इतर आजारांमधील फरक

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना व्हायरसची सविस्तर लक्षणे – कोरोनाची तीव्र ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास हा आपल्याला माहित आहे. पण हा त्रास तीव्र किंवा गंभीर कोरोनाच्या रुग्णालाच होतो. ८५ टक्के लोकांना कोरोना संसर्ग झाला तरी एक तर साधा ताप आणि थोडा खोकला असा सौम्य स्वरुपाची लक्षण दिसतील. त्यातही काहींना असे ही होऊ शकते की काहीच लक्षणे आली नाहीत. म्हणून साधा खोकला, ताप, सर्दी असली तरी आपल्याला इतरांपासून लांब रहायचे आहे हे समजून घ्यावे.

COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी? कारण कोरोना व्हायरस शी लढताना आपले सगळ्यात मोठे हत्यार असणार आहे आपली प्रतिकारशक्ती. त्यातच ६० वर्षावरील ज्येष्ठ आणि मधुमेह असणाऱ्यांनी प्रतिकारशक्ती वाढवण्याची विशेष काळजी घ्यायला हवी. COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी? यासाठी काही टिप्स.

कोरोना प्रतिबंध आणि शासन कोरोना संदर्भात स्वच्छतेच्या मुलभूत नियमांचा आता पुरेसा प्रचार झाला आहे. शासन आता जितक्या आक्रमकपणे आणि विचारपूर्वक साथ नियंत्रणाचे, प्रतिबंधाचे काम करील तेवढे नुकसान कमी होईल. ‘घाबरू नका’ असे सांगताना शासनाकडून ठोस कृती होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.