Articles

बेंबीचा फुगा – अंबीलीकल हर्निया

By Amol Annadate

May 09, 2020

बेंबीचा फुगा – अंबीलीकल हर्निया साधारतः जन्मानंतर आठव्या ते नवव्या दिवशी नाळ पडते. पण काही बाळांमध्ये बेंबीच्या जागा फुगवटा तयार होतो व त्याचा आकार कमी जास्त होतो. बाळ रडताना , हसताना, खोकताना, शी – सु करताना व कुठल्याही कारणाने पोटातील दाब वाढल्यास ही सूज वाढते. इतर वेळी ती कमी ही होते. या फुगवट्यात येणाऱ्या आतड्यांचा भाग हा हाताने खाली ढकलता येतो. या फुगवट्याला अंबीलीकलहर्निया म्हंटले जाते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

बेंबीचा फुगा – अंबीलीकल हर्निया जन्मतः बेंबी भोवतीचे स्नायू कमकुवत असल्याने हा हर्निया निर्माण होतो.बाळ जस जसे मोठे होते तसे पोटांच्या स्नायूंची ताकत वाढल्यास हा हर्निया अपोआप कमी होतो. या फुगवट्याला उपचारांची गरज नसते. सहसा हर्निया हा ६ महिन्यापूर्वी येतो व बहुतांश वेळा १ वर्षापर्यंत अपोआप नाहीसा होतो. काही अंबीलीकलहर्निया ५ वर्षापर्यंत नाहीसे होतात.

चुकीच्या उपचारांमुळे अपाय होण्याची शक्यता

बेंबीचा फुगा – अंबीलीकल हर्निया याला गैरसमजा पोटी फुगवटा कपडा किंवा चिकट पट्टीने बांधणे, त्यावर नाणे लावून बांधणे, पट्टा बांधणे असे चुकीचे व गरज नसलेले उपाय केले जातात. याची गरज नसते , फायदा ही होत नाही व त्याने अनावश्यक गुंतागुंत ही निर्माण होते.

उपचारांची / शस्त्रक्रियेची गरज कधी पडते –

आतडी या फुगवट्यात अडकल्याच्या पुढील लक्षणांवरून कळते

ही लक्षणे अढळल्यास तातडीने बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता