Articles

बालदमा आणि उपचार

By Amol Annadate

July 12, 2020

बालदमा आणि उपचार काही मुलांमध्ये अनुवांशिक कारणांमुळे वातावरणातील ॲलर्जीन, फुलांचे परागकण,धूर, हवेतील प्रदूषणकण, गारवा, तीव्र वास व काही विषाणूंमुळे श्वसन मार्ग आकुंचन पावतो व त्याचा व्यास लहान होतो. जन्माच्या वेळी कमी वजन असणे व पहिल्या दोन वर्षांत गंभीर न्युमोनिया व इतर फुफ्फुसाचा संसर्ग व इतर अलर्जीचे आजर असल्यास बालदमा होण्याची शक्यता वाढते.पुणे लहान मुलांमध्ये श्वसन मार्ग, वातावरणातील घटक जास्त संवेदनशील असल्याने वारंवार आकुंचन पावून छोटा होण्याच्या आजाराला बालदमा म्हणतात. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कारणे  काही मुलांमध्ये अनुवांशिक कारणांमुळे वातावरणातील ॲलर्जीन, फुलांचे परागकण, धूर, हवेतील प्रदूषणकण, गारवा, तीव्र वास व काही विषाणूंमुळे श्वसन मार्ग आकुंचन पावतो व त्याचा व्यास लहान होतो. जन्माच्या वेळी कमी वजन असणे व पहिल्या दोन वर्षांत गंभीर न्युमोनिया व इतर फुफ्फुसाचा संसर्ग व इतर अलर्जीचे आजर असल्यास बालदमा होण्याची शक्यता वाढते.

दमा सुरू झाल्यावर पुढील गोष्टींमुळे तो वाढतो व या गोष्टींना श्वसनमार्ग संवेदनशील असतो. ते जितके टाळता येतील तितका दमा नियंत्रणात राहतो.

लक्षणे – तापाशिवाय वारंवार सर्दी, खोकला.  – फक्त कोरडा खोकला वारंवार येणे, पहाटे व संध्याकाळच्या वेळी जास्त येणे. – श्वास घ्यायला त्रास होणे व त्यासोबत शिट्टीसारखा आवाज येणे.  – शांत झोप न लागणे.  – थकवा येणे. 

बालदमा आणि उपचार बालदमा नेमका काय आहे, हे पालकांना समजून सांगताना मी माणसाच्या स्वभावाचे उदाहरण देतो. जसा काही जणांचा रागीट स्वभाव असतो तसेच काही कारणाने तुमच्या मुलाचे फुफ्फुस व श्वसनमार्ग थोडे रागीट आहेत. रागीट माणसाला जसे जपावे लागत, कशाने राग येईल हे ओळखून त्या गोष्टी सांभाळाव्या लागतात, तसेच बालदमा असलेल्या मुलाच्या श्वसन मार्गाला राग येऊ नये म्हणून वर दिलेले ट्रिगर्स, म्हणजे दमा वाढवणारे घटक सांभाळावे व नियंत्रणात ठेवावे म्हणजे, दमा नियंत्रणात राहील. जसा रागीट स्वभाव पूर्ण जात नाही, पण तो नियंत्रित करता येतो तसाच बालदमा ही नियंत्रित करता येतो. वय वाढते व प्रगल्भता येते तसा रागीट स्वभाव सौम्य होतो, तसेच वय वाढल्यावर फुफ्फुस प्रगल्भ होते आणि  बालदमा नाहीसा होतो. रागीट स्वभावाचा माणूस नॉर्मल आयुष्य जगतो व सगळे करू शकतो, तसेच दम्याचा रुग्ण हा नॉर्मल आयुष्य जगू शकतो.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.