Articles

संसर्गासाठी संपर्काची वेळ महत्वाची

By Amol Annadate

June 15, 2020

संसर्गासाठी संपर्काची वेळ महत्वाची संसर्ग होण्यासाठी कोरोनाबाधित व्यक्ती सोबत फक्त संपर्कच नव्हे तर संपर्काची  वेळ आणि व्यक्ती पासून अंतर  हे  संसर्गाची शक्यता ठरवणारी महत्वाची घटक आहेत. या विषयी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे भूतपूर्व प्रती कुलगुरू व  मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनऔषधवैद्यक शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. शेखर राजदेरकर सांगतात की जर कोरोना रुग्णाशी मास्क न घालता तुमचा  अर्धा तास बोलण्यासारख्या  स्वरुपात जवळचा संपर्क आला तर संसर्ग होईल पण ही संपर्काची  वेळ २५ मिनिटे झाली तर संसर्गाची  शक्यता ९० % इतकी कमी होईल. जर  हीच संपर्काची वेळ १५ मिनिटे इतकी कमी झाली तर मात्र संसर्ग झाला तरी तो लक्षणविरहीत  किंवा अत्यंत सौम्य लक्षणे असलेला असेल. जर संपर्काचा हाच कालावधी गृहीत धरून यात नाक व तोंड पूर्ण झाकणारा मास्क, ६ फुटा पेक्षा जास्त शारीरिक अंतर आणि संपर्कानंतर हात धुणे या प्रतिबंधक उपायांची भर पडली तर संसर्गाची शक्यता खूपच कमी होते. म्हणजेच कोरोना संसर्गित रुग्णाचा १५ मिनिटांपेक्षा कमी संपर्क आणि हे प्रतिबंधक उपाय कोरोना टाळण्यासाठी प्रभावी अस्त्र ठरू शकते . कमी संपर्काच्या वेळेने झालेल्या संसर्गातून रुग्ण गंभीर होण्याची शक्यता कमी असेल. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

वेळे सोबतच पुढील काही गोष्टी संसर्गाची शक्यता ठरवतील –

वरील गोष्टी गृहीत धरल्यास पुढील गोष्टींमध्ये संसर्गाची शक्यता जास्त कि कमी हे सांगता येईल.

जागा संसर्गाची शक्यता
कोरोनबाधित व्यक्तीशी मास्क वापरून व ६ फुट पेक्षा जास्त अंतर राखून समोरा समोर बोलल्यास  –संपर्क  वेळ ५ मिनिटा पेक्षा कमी असल्यास खूप कमी  
चालताना / जॉगिंग / सायकलिंग करतना  दोघांनीही मास्क घातला असल्यास नाही
हवेशीर व मोकळ्या जागेत संपर्क आल्यास व ६ फुट अंतर राखल्यास कमी
किराणा दुकान व इतर दुकाने शक्यता
छोट्या जागेत जास्त लोक जास्त
सार्वजनिक शौचालय / बाथरूम जास्त
कमाच्या बंदिस्त जागा / शाळा  जास्त
लग्न समारंभ / इतर अनेक लोक जमतील असे सार्जनिक समारंभ जास्त
धार्मिक स्थळे जास्त
सिनेमा गृहे / नाट्य गृहे / शॉपिंग मॉल जास्त

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता