Articles

उपवास नकोच

By Amol Annadate

April 25, 2020

 उपवास नकोच कोरोना मुळे अनेक धार्मिक चाली रीतींना छेद देऊन विज्ञानवादी आणि आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त काय याला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

त्यातली सध्या आपण सोडून द्यावी अशी गोष्ट म्हणजे उपवास. उपवास आणि मानवी शरीरावर होणारे परिणाम यावर बरेच संशोधन झाले आहे. त्यात एका विशिष्ट पद्धतीने व काही गोष्टी खाऊन केलेल्या जास्त दिवस उपवासाचे फायदे ही दिसून आले आहेत. पण त्यासाठी आदर्श वातावरण व रोज ठरलेल्या गोष्टी खाल्ल्या गेल्या पाहिजे. सध्याच्या साथ सुरु असताना तसेच अस्थिर वातावरणात उपवास करणे हे तुमच्या प्रतिकारशक्ती वर नकारत्मक परिणाम करू शकते. म्हणून रोज नियमित व उच्च प्रथिने युक्त आहार घेणे सध्या खूप महत्वाचे आहे. उपवास नकोच घरातील वृध्द व्यक्तींना, मधुमेह असलेल्यांना कोरोनाचा धोका जास्त असतो. नेमक्या घरातील अशा वृद्धांनी विविध वार व देवांचा उपवास वर्षानुवर्षे धरलेला असतो. त्यामुळे या लोकांना कोरोनाचा धोका जास्त प्रमाणात असू शकतो. म्हणून किमान साथ सुरु असे पर्यंत अशा लोकांना काही काळ उपवास न करता नियमित आहार घ्यावा. आजारी असलेल्या व्यक्तींनी जितकी इच्छा होईल तितके खावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता