Articles

‘कोरोना’चा रुग्ण कधीपर्यंत इतरांना संसर्गित करू शकतो!

By Amol Annadate

May 28, 2020

‘कोरोना’चा रुग्ण कधीपर्यंत इतरांना संसर्गित करू शकतो! सध्या अनेक रुग्ण ७ दिवसांनी सौम्य लक्षणे असल्यास घरी पाठवले जात असले आणि घरी अलगीकरणात ( आयसोलेशन ) राहायला सांगितले जात असले तरी नेमके कधी पर्यंत अलगीकरणात राहायचे हे मात्र अनेकांना नीट माहित नाही. हे किती दिवस कोरोणाचा बरा झालेला रुग्ण इतरांना संसर्ग करू शकतो यावर ठरेल. याचे उत्तर प्रत्येक देशा गणिक आणि व्यक्ती गणिक बदलू शकते. पण याचे शास्त्रीय उत्तर आहे जो पर्यंत व्यक्ती ची लक्षणे पूर्ण जात नाहीत आणि जो पर्यंत टेस्ट कोरोना निगेटिव्ह येत नाही तो पर्यंत कोरोनाचा रुग्ण इतरांना संसर्गित करू शकतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

    ‘कोरोना’चा रुग्ण कधीपर्यंत इतरांना संसर्गित करू शकतो! सिंगापूर मधील एका अभ्यासात असे दिसून आले की बाधित झाल्यावर व पॉझीटीव असला तरी तो ११ दिवसच इतरांना संसर्गित करतो. पण या अभ्यासाच्या निष्कर्षावर अवलंबून राहता येत नाही. कारण चीन मध्ये एका अभ्यासात रुग्ण बरा झाला व निगेटिव्ह असला  तरी ३० दिवसांपर्यंत इतरांना संसर्गित करू शकतो असे दिसून आले. आपल्या देशा साठी याच्या मधला आकडा सध्या संशोधन होई पर्यंत ग्राह्य धरला जाऊ शकतो. म्हणून रुग्णालयातून  ७ दिवस झाल्यावर टेस्ट करणार नसाल तर घरी १४ दिवस असे एकूण २१ दिवस आयसोलेशन मध्ये राहिल्यास चांगले. यात चौदाव्या दिवशी जर टेस्ट केली व ती निगेटिव्ह असेल व कुठली ही लक्षणे नसतील तर १४ दिवसा नंतर आयसोलेशन संपवण्यास हरकत नाही. पण चौदाव्या दिवशी टेस्ट निगेटिव्ह असून लक्षणे गेली नसतील तर मात्र आयसोलेशन लक्षणे संपे पर्यंत चालू ठेवावे.  हे आयसोलेशन स्वतः साठी महत्वाचे आहेच पण आपल्या कुटुंबाला व संपर्कात येणाऱ्या इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून ही महत्वाचे आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता