Articles

कुणीही रॅपीड अँटीजीन टेस्ट वापरणे चुकीचे

By Amol Annadate

July 20, 2020

कुणीही  रॅपीड अँटीजीन टेस्ट वापरणे चुकीचे काही शहरांत व्यापाऱ्यांना दुकान उघडण्याआधी रॅपीड अँटीजीन टेस्ट सक्तीची केली आहे. या चुकीचे अनुकरण इतर शहरात आणि रहीवाशांकडून होण्याची शक्यता आहे. खाजगी लॅब मध्ये रॅपीड अँटीजीन टेस्टला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लक्षणे नसलेल्यांनी स्वतः ची रॅपीड अँटीजीन टेस्ट करणे चुकीचे आहे. ही चाचणी सध्या लक्षणे आलेल्यांसाठी राखून ठेवायला हवी या टेस्ट बद्दल पुढील गोष्टी समजून घ्याव्या.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

१.         ही टेस्ट पॉझीटीव्ह आली तर रुग्ण कोरोना बाधित असल्याची दाट शक्यता आहे पण निगेटिव्ह आली तर मात्र आरटी पीसीआर करून निगेटिव्ह असल्याची खात्री करावी लागते. २.         तुम्ही आज रॅपीड अँटीजीन टेस्ट करून निगेटिव्ह आहात म्हणजे उद्या तुम्ही व इतरांनी प्रतिबंधाच्या मुलभूत उपाय न वापरल्यास बाहीत होऊ शकता. ३.         तुम्ही व्यापारी असाल किंवा कुठल्या ही व्यवसायात असाल तर तुम्ही रोज दुकान उघडण्या आधी रॅपीड अँटीजीन टेस्ट करून बाधित नसल्याची खात्री करू शकत नाही. ४.         लक्षणे नसताना टेस्ट करून लक्षणे असलेल्या व टेस्टची गरज असलेल्यांना टेस्ट पासून वंचित ठेवत आहात.

रॅपीड अँटीजीन टेस्ट कोणी करावी ––         आरटी पीसीआर ने निश्चित निदान झालेल्या रुग्नाच्या कुटुंबातील सर्व सदस्य ज्यांचा रुग्णाशी थेट संबंध आला आहे. –         कामाच्या ठिकाणी अशा व्यक्ती ज्यांचा ३० मिनिटांपेक्षा जास्त थेट संबंध आला आहे. –         ५० वर्षा पुढील व्यक्ती , गरोदर स्त्रिया , इतर दीर्घकालीन आजार असलेल्या  (को मॉर्बिड) व्यक्ती ज्यांना ताप , सर्दी , खोकला ही फ्लू सदृश लक्षणे दिसत आहेत.–         कंटेनमेंट झोन मधील कुठल्या ही वयाच्या कुठल्या ही व्यक्तीला  ताप , सर्दी , खोकलाही फ्लू सदृश लक्षणे आहेत.

दुकानदार, व्यापारी यांची स्क्रीनिंग करायचीच असेल तर कुठली टेस्ट वापरावी ––     कुणीही रॅपीड अँटीजीन टेस्ट वापरणे चुकीचे स्क्रीनिंग साठी रॅपीड अँटीबॉडी टेस्ट वापरण्यास हरकत नाही, यात जे आय जी एम पॉझीटीव्ह आले आहेत त्यांना नुकताच संसर्ग झाला आहे असे समजून त्यांनी पुढील १४ दिवस घरी व लक्षणे असल्यास रुग्णालयात / स्थानिक महानगरपालिकेच्या नियमा प्रमाणे दाखल व्हावे. आय जी जी असल्यास त्यांनी मास्क व सोशल डीस्टन्सिंग पाळत काम करावे.

 काही लाक्षणविरहीत पॉझीटीव्ह सापडले मग हे यश नाही का ?औरंगाबाद प्रयोगात या टेस्ट चा वापर करून काही लाक्षणविरहीत पॉझीटीव्ह सापडले हा फायदा असला तरी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून याचे महत्व तेव्हाच असेल जेव्हा व्यापारी या एका गटाचा नव्हे तर एकाच वेळी सर्व शहराचे स्क्रीनिंग होईल. मर्यादित टेस्ट हाती असताना पूर्ण लोकसंख्येसाठी टेस्टचे रेशनिंग करणे आवश्यक असते.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.