Articles

कमी बोला, हळू बोला, कोरोना टाळा!

By Amol Annadate

July 01, 2020

कमी बोला , हळू बोला, कोरोना टाळा!

कमी बोला, हळू बोला, कोरोना टाळा! तुम्ही एक मीटरपेक्षा जास्त अंतरावर आहात आणि बंद खोलीत कोणी मोठ्याने बोलले तर तुम्हाला कोरोनाबाधित व्यक्तीकडून संसर्ग होऊ शकतो.

आपण खोकणे, शिंकणे या बाबतीत काळजी घेतो पण अजून एक गोष्ट आहे जी कोरोनाचा संसर्ग वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. ती म्हणजे बोलणे. अनेकांना मोठ्याने बोलण्याची सवय असते. त्यातच फोनवर बोलताना ग्रामीण भागात अजूनही असा समज आहे कि मोठ्याने बोलल्याशिवाय मोबाईलवर आवाज नीट जात नाही. म्हणून सार्वजनिक ठिकाणी मोबाईलवर अनेक जण मोठ्याने बोलत असतात. तसेच मोबाईलवर बोलताना किंवा समोरासमोर बोलताना समोरच्याला नीट कळावे म्हणूनही अनेकजण नेमका त्याच वेळी मास्क खाली करतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

संशोधन काय सांगते कमी बोला, हळू बोला, कोरोना टाळा! तुम्ही एक मीटरपेक्षा जास्त अंतरावर आहात आणि बंद खोलीत कोणी मोठ्याने बोलले तर तुम्हाला कोरोनाबाधित व्यक्तीकडून संसर्ग होऊ शकतो. मोठ्याने बोलल्याने १००० मायक्रो ड्रॉपलेट हवेत सोडले जातात व मास्क नसेल आणि खोली बंद असेल तेव्हा ते एकमीटरपेक्षा जास्त अंतरावर पसरतात. तसेच विषाणू १४ मिनिटे म्हणजे हळू बोलण्याच्या तुलनेत जास्त वेळ हवेत राहतात. जर हळू आवाजात बोलले आणि मास्क लावलेला असला तर ही शक्यता खूप कमी होते.

बोलताना पुढील काळजी घ्या

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.