Articles

तोतरेपणा किंवा बोलण्यातील समस्या

By Amol Annadate

August 09, 2020

तोतरेपणा किंवा बोलण्यातील समस्या अनेक मुलां-मुलीमध्ये तोतरेपणा किंवा बोलतानाच्या समस्या आढळून येतात. मात्र ही व्याधी गंभीर नसल्याने त्याच्या उपचारासाठी फारसे प्रयत्न होत नाहीत. परंतु, ही समस्या बरेच दिवस रेंगाळल्यास त्याचा मानसिकतेवर परिणाम होऊन न्यूनगंड निर्माण होतो. म्हणूनच अशी समस्या असलेल्यांना उपचार व मानसिक आधाराची गरज असते. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

तोतरेपणा व बोलण्याच्या समस्या म्हणजे नेमके काय? ज्या मुलांमुलीना वाक्य सुरू करण्यास उशीर लागतो, बोलताना उच्चार स्पष्ट करता येत नाहीत, वाक्य सुरू केल्यावर मध्येच अडखळते, एखादा शब्दच उच्चारता येत नाही किंवा एखादा शब्द गरज व इच्छा नसताना पुनःपुन्हा उच्चारला जातो, असे असल्यास बोलण्याची समस्या असल्याचे निदान केले जाते.

कारणे –

तपासण्या व निदान  डोक्याला मार लागल्याचा इतिहास असल्यास गरज भासल्यास तोतरेपणासाठी सीटी. स्कॅन किंवा एमआरआय या तपासण्या कराव्या लागतात. रेटिंग स्केलवर तोतरेपणाची तीव्रता ठरवली जाते.

उपचार –

श्‍वासाचा व्यायाम  १ ते १० पर्यंत आकडेमोड करत नाकाने हळू श्‍वास आत घ्यावा, डायफ्राम जितका खाली जाईल, तितका जाऊ द्यावा. त्यानंतर १ ते १० पर्यंत मोजत तोंडाने श्‍वास बाहेर सोडवा. असे सलग दहावेळा करावे.

घरगुती उपचार  

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.