Articles

लसीचे काय ?

By Amol Annadate

July 23, 2020

लसीचे काय ? ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीचे सकारात्मक अहवाल हाती आल्याने लसी विषयी सर्वांच्याच आशा उंचावल्या आहेत पण या यशाचे संशोधनात्मक दृष्टीने विश्लेषण करायला हवे. आदर्श लस म्हणजे काय ?ज्या लसीचे कमीत कमी डोस घ्यावे लागतात, शेवटच्या डोस सहा महिने तरी प्रतिकारशक्ती टिकून राहते आणि कमीत कमी दुष्परिणाम होतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

लस चाचणीच्या चार फेज कुठल्या असतात ?फेज १ – २० – ८० मानवांवर चाचण्या फेज २ – काही शे म्हणजे १००० पर्यंत लोकांपर्यंत मानवांवर चाचणी फेज ३ –  काही हजार लोकांवर चाचण्या फेज ४ – लस बाजारात आल्यावर येणारे रिपोर्ट

ऑक्सफर्ड लसीचे यश किती ?सध्या लँन्सेट मध्ये प्रकाशित झालेला ऑक्सफर्ड लसीचा  अहवाल हा फेज १ व २ चे आहेत व यात दोन डोस नंतर ५६ दिवसांना प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते असे दिसून आले आहे. यात प्रतिपिंड – अँटीबॉडी सहित टी सेल ही दीर्घ काळ टिकणारी प्रतिकारशक्ती आढळून येणे सकारत्मक आहे. पण ही प्रतिकारशक्ती किती काळ टिकून राहते याचे अंतिम निष्कर्ष हाती येण्यास किमान ६ महिने तरी वाट पहावी लागणार आहे

भारतासाठी या लसीचे महत्व काय ?लसीचे काय ? कुठल्या ही परदेशी लसीच्या यशाने हुरळून जाण्या आधी  भारतीयांनी जरा धीराने घ्यावे. कारण भारतातील कोरोनाची स्ट्रेन आणि परदेशांत लसी साठीच्या कोरोनाच्या स्ट्रेन वेगळ्या असू शकतात. हीच गोष्ट फ्लू लसीच्या बाबतीत ही घडते. तसेच आपली भारतीयांची प्रतिकारशक्ती परदेशी लसीच्या चाचण्यात परदेशी व्यक्तींवर केलेल्या प्रयोगात जसा प्रतिसाद मिळतो तसाच प्रतिसाद मिळेल हे निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणून कुठल्या ही परदेशी लसीचे भारतीयांवर प्रयोग यशस्वी झाल्या शिवाय या परदेशी लसीवर पूर्ण विश्वास ठेवता येणार नाही

भारतीय लसीचे काय ?भारतात सध्या ७ कंपन्या लसीवर काम करत आहेत. ऑगस्टच्या पहिल्या महिन्यात फेज १ मानवी चाचण्या सुरु होणार आहेत.

लस आली तरी पुढे काय ?लस आली व सर्वांनी ती घेतली तरी काही काळ तरी सोशल डीस्टन्सिंग , मास्क व हात धुण्याचे महत्व अबाधित राहणार आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.