Articles

पल्सऑक्सीमीटर कुठल्या बोटाला लावावा

By Amol Annadate

July 15, 2020

पल्सऑक्सीमीटर कुठल्या बोटाला लावावा सध्या अनेक लोक होम क्वारनटाईन व होम आयसोलेशन मध्ये आहेत. होम आयसोलेशन मध्ये असलेल्यांनी रोज २ वेळा  तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या सौम्य कोरोना रुग्णांनी दिवसातून २ वेळा आणि मध्यम लक्षणांच्या रुग्णांच्या रुग्णांनी दर सहा तासांनी आपली ऑक्सिजनची पातळी तपासून पहावी. यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी घटत असल्यास ती लवकर लक्षात येऊन त्याचे उपचार सुरु करता येतात. तसेच या सर्वांनी रोज दोन वेळा ६ मिनिट वॉक टेस्ट करावी.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

     पल्सऑक्सीमीटर कुठल्या बोटाला लावावा पण हे सर्व करत असताना नेमक्या कुठल्या बोटाला पल्सऑक्सीमीटर लावायचा हे माहित असायला हवा. यासाठी जो हात आपण कामासाठी जास्त वापरतो व ज्या हाताने लिहितो, त्या हाताचे मधले बोट वापरायला हवे म्हणजे सर्वात मोठे बोट. पल्सऑक्सीमीटर हे बोटाच्या टोकाला म्हणजे नख व त्या मागच्या भागावर लावून पाहिले जाते. यात मधल्या बोटाला हाताच्या दोन्ही मुख्य रक्त वाहिन्यांचा प्रवाह आसतो . तुलनेने इतर बोटांना कमी असतो. म्हणून लिहिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मधल्या बोटाला सर्वात अचूक पल्सऑक्सीमीटर ची रीडिंग येते.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.