Articles

प्लाझ्मा दान कोण करू शकत ?

By Amol Annadate

July 22, 2020

प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमके काय ? कोरोना मधून बरे झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्मा  या रक्तातील भागात कोरोना विरोधात प्रतिकारशक्ती दर्शवणारे अँटीबॉडीज – प्रतिपिंडे असतात. ही प्रतिपिंडे म्हणजे कोरोना विरोधात लढण्यास शरीराने रक्तात तयार केलेले सैनिकच असतात. कोरोना बाधित रुग्णाला कोरोना तून बरे झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून प्लाझ्मा  मधून हे आयते सैनिक देणे म्हणजे प्लाझ्मा  थेरपी.

सध्या प्लाझ्मा  देण्याचे नियम काय ?

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

हा प्लाझ्मा  वेगळा कसा केला जातो ?या प्रक्रियेला अफेरेसीस असे म्हणतात. या प्रक्रियेत अफेरेसीस करण्याचे मशीन उपलब्ध असलेल्या रक्त पेढीत रक्तातून – लाल पेशी , प्लेटलेट व प्लाझ्मा  वेगळा केला जातो.

प्लाझ्मा  दान कोण करू शकते –

एकदा प्लाझ्मा  दान केल्यावर परत किती दिवसांनी दुसर्यांदा करता येते –एका वेळेला २०० ते ६०० एमएल प्लाझ्मा  दान करता येते. एकदा दान केल्यावर २ महिन्यांनी दुसऱ्यांदा दान करता येते.

कोरोनातून बरे झालेले कुठे प्लाझ्मा  दान करू शकतात –प्लाझ्मा दान कोण करू शकत ? दिल्लीच्या धर्तीवर अजून खास प्लाझ्मा  डोनेशन बँक महाराष्ट्रात सुरु झालेली नाही. तसेच याची निश्चित माहिती नाही. पण अशा इच्छुकांनी दान करण्यासाठी जिल्हावार जागा ठरवून त्याची यादी शासनाने जाहीर करावी. सध्या १७ वैद्यकीय महाविद्यालयात याचा प्रयोग सुरु आहे. पण कुठल्या भागात नेमके कुठे जाऊन दान करायचे याची माहिती अजून उपलब्ध नाही.

प्लाझ्मा  कोणाला गरजेचे आहे ?प्लाझ्मा  लाक्षाणविरहित , सौम्य व मध्यम स्वरूपाच्या कोरोना रुग्णाला गरजेचा नाही. फक्त गंभीर रुग्णालाच प्लाझ्मा  गरजेचा आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.