सौम्य, मध्यम व तीव्र कोरोना

सौम्य, मध्यम व तीव्र कोरोना

सौम्य, मध्यम व तीव्र कोरोना कोरोनाचा संसर्ग झाल्यावर बहुतांश जणांमध्ये तो सौम्य / मध्यम स्वरूपाचा असेल म्हंटले जाते. सौम्य, मध्यम व तीव्र कोरोना पण आपल्याला झालेला कोरोना हा नेमका सौम्य / मध्यम स्वरूपाचा आहे आणि ही पातळी ओलांडल्यावर त्याला कधी सिरीयस मानायचे हे सर्वांना माहित असायला हवे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  सौम्य मध्यम तीव्र ( सिरीयस )
ऑक्सिजनची पातळी ९४ पेक्षा जास्त ९० ते ९४ ९० पेक्षा कमी
श्वासाची गती २४ पेक्षा कमी २४ ते ३० ३० पेक्षा जास्त
निमोनिया नाही असतो जास्त असतो
सि.टी. स्कॅन नॉर्मल / २५ टक्के पेक्षा कमी २५ – ७५ टक्के ७५ – १०० टक्के
ऑक्सिजनची गरज नाही लागू शकते –  ऑक्सिजन टार्गेट ९२-९६ टक्के लागते ऑक्सिजन टार्गेट ९० टक्के पेक्षा जास्त
ब्लड प्रेशर हृदयाचे ठोके मोजण्याची गरज दररोज एकदा दररोज  दर ६ तासांनी दररोज  दर ४ तासांनी
श्वासाची गती आणि ऑक्सिजन दररोज दर ६ तासांनी दररोज दर २ तासांनी सतत
सुट्टी कधी लक्षणांपासून १० दिवसांनी + ३ दिवस ताप नसावा व श्वास घेण्यास त्रास नसावा. लक्षणांपासून १० दिवसांनी + ३ दिवस ताप नसावा व श्वास घेण्यास त्रास नसावा. पूर्ण बरे झाल्यावर

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

संसर्ग, साथींवर पावसाळ्याचा काय परिणाम होतो?

संसर्ग, साथींवर पावसाळ्याचा काय परिणाम होतो

संसर्ग, साथींवर पावसाळ्याचा काय परिणाम होतो? “उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे कोरोना संसर्ग कमी होईल, असे बोलले जात होते; पण तसे काही झाले नाही व साथ उन्हाळ्यात वाढलीच. आता अनेकांच्या मनात प्रश्न आहे की,पावसाळ्याचा कोरोनावर काही परिणाम होतो का? कुठल्याही विषाणूच्या प्रसारावर सहसा तीन गोष्टींचा परिणाम असतो. हवामानातील बदल, मानवाचे वर्तन तसेच आणि विषाणूमध्ये होणारे जनुकीय बदल व संक्रमण.आयआयटी मुंबईमधील एका प्रयोगात दिसून आले की, पावसाळ्यातील दमट हवामान कोरोनासाठी पोषक असून संसर्ग वाढवणारे ठरू शकते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

संसर्ग, साथींवर पावसाळ्याचा काय परिणाम होतो? हे ठामपणे सांगण्यास व सिद्ध करण्यास हा एक अभ्यास पुरेसा नाही. यासाठी एक ते दोन वर्षे कोरोना विषाणू संक्रमित होतो का व त्यांनतर प्रत्येक ऋतूमध्ये त्याचे वर्तन कसे असेल या अभ्यासानंतरच हे ठामपणे सांगता येईल. पण सर्दी-खोकला, आरएसव्ही हे सर्व विषाणू पावसाळ्यात जास्त प्रमाणात पसरतात. हे गृहीत धरून पावसाळ्यात जास्त सतर्क राहण्याची गरज नक्कीच आहे. पावसाळ्यामध्ये मानव वर्तणुकीवर असे काही परिणाम होतात, ज्यामुळे संसर्गसाखळी तोडण्यास मदतही होऊ शकते. ते म्हणजे इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात लोक जास्त घरात राहतात. बाहेर पडत नाहीत. यामुळे गर्दीचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे इतरांशी कमी संपर्क येऊन संसर्गाचे प्रमाण कमी होण्याचा फायदा होऊ शकतो.पावसाळ्यातील एक गोष्ट मात्र कोरोनाची गुंतागुंत वाढवते. पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस हे आजारही वाढतात. त्यामुळे तापाचे रुग्ण पावसाळ्यात जास्त असतात. या इतर आजारांच्या वाढलेल्या प्रमाणामुळे तापाचा रुग्ण कोरोनाचा की इतर आजारांचा, हे निदान करताना गोंधळ उडतो. म्हणून या काळात आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून, छतावर किंवा घराभोवती पाणी तुंबू न देता डासांना अटकाव करायला हवा. म्हणजे इतर आजार कमी होतील. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी होईल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

बाधित तरीही चाचणी निगेटिव्ह

बाधित तरीही चाचणी निगेटिव्ह

बाधित तरीही चाचणी निगेटिव्ह दिल्लीत एका निवासी डॉक्टर चा मृत्यू झाला व त्याची सर्व लक्षणे कोरोना सारखी होती. दोन वेळा केलेली कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली. त्यामुळे कोरोना असलेल्या रुग्णाची टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते व टेस्ट सोबत लक्षणे व डॉक्टरांचा अनुभव निदान व उपचार करताना ग्राह्य धरणे महत्वाचे ठरते. यातून बोध घेण्या सारख्या व सावध होण्या सारख्या काही गोष्टी आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना असून ही टेस्ट निगेटिव्ह का येऊ शकते ?
आरटी पीसीआर टेस्ट ही निदाना साठी सर्वात चांगली असली तरी पुढील तीन करणाने कोरोना संसर्ग असून ही ती निगेटिव्ह येऊ शकते –

  • फक्त नाकातून किंवा घशातून घेतली असेल तर. फक्त नाकातून स्वॅब घेतल्यास  ३७ %  आणि फक्त घशातून स्वॅब घेतल्यास ६८ % रुग्ण  कोरोना संसर्गित असून हि  निगेटिव्ह येऊ शकतात. घसा व नाक दोन्हीतून स्वॅब घेतला असेल तर पाँझीटीव्ह येण्याची शक्यता वाढते.
  • स्वॅब घेताना डोळ्यातून पाणी येईल इतका तो  घासून घ्यावा लागतो. वरवर स्वॅब घेतल्यास पुरेशा पेशी स्वॅबला लागत नाहीत.
  • संसर्गाच्या पहिल्या तीन ते चार दिवसात टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते.
  • कोविड – 19 सोडून इतर फुफ्फुसावर परिणाम करणारे कोरोना किंवा इतर विषाणू संसर्ग असू शकतो.

वरील घटक नसले आदर्श पद्धतीने जरी तपासणी व लक्षणे सुरु होऊन ८ दिवस झाले असले  तरी तपासणी कोरोना संसर्ग ओळखू न शकण्याच प्रमाण 20 % आहे

मग यावर उपाय काय –
बाधित तरीही चाचणी निगेटिव्ह जर लक्षणे कोरोनाची वाट असतील म्हणजे ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास व कोरोना संसर्गित व्यक्तीशी खात्रीशीर रित्या संपर्क आला असेल तर

  • टेस्ट परत एकदा करावी.
  • दुसऱ्या टेस्टचा अहवाल येई पर्यंत स्वतः आयसोलेशन मध्ये राहावे.
  • दुसरी टेस्ट ही निगेटिव्ह असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्या प्रमाणे वागावे व ते म्हणत असतील तर कोरोना चे उपचार करून पुढील १४ दिवस स्वतःच्या लक्षणांवर लक्ष ठेवावे व आयसोलेशन सुरु ठेवावे.
  • लक्षणे सुरु होऊन सात दिवस झाले असतील तर रॅपीड अँटीबॉडी टेस्ट करावी.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

चाचण्यांचे विश्लेषण

चाचण्यांचे विश्लेषण

चाचण्यांचे विश्लेषण पीसीआर,   आयजीएम  व   आयजीजी  यांचे एकत्रित विश्लेषण कसे करावे हे पुढे सांगितले आहे.   यात    +  म्हणजे टेस्ट  पॉजिटीव्ह व – म्हणजे टेस्ट निगेटिव्ह समजावे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  1.  चाचण्यांचे विश्लेषण पीसीआर  +,  आयजीएम  – ,    आयजीजी –    संसर्गाची सुरुवातीची स्टेज पण संसर्ग होऊन ७ दिवस होऊन गेले आहे.
  2.  पीसीआर  +,  आयजीएम  + ,    आयजीजी –   रुग्णावर जास्त लक्ष  ठेवण्याची गरज आहे कारण संसर्ग होऊन ७ दिवस झाले आहेत व  आठव्या दिवसापासून बाराव्या दिवसापर्यंत गुंतागुंतीची शक्यता जास्त आहे.              
  3. पीसीआर टेस्ट केली नाही,  आयजीएम  + ,    आयजीजी –   संसर्गाची सुरुवातीची स्टेज पण आरटी पीसीआर करून निदान निश्चित करणे गरजेचे आहे.
  4. पीसीआर  +,  आयजीएम  + , आयजीजी +   संसर्गाची अॅक्टीव स्टेज. 
  5. पीसीआर टेस्ट केली नाही. आयजीएम  + ,    आयजीजी +   संसर्गाची अॅक्टीव स्टेज, पण आरटी पीसीआर करून निदान निश्चित करणे गरजेचे आहे. 
  6. पीसीआर  – ,  आयजीएम  + ,    आयजीजी –   संसर्गाची सुरुवातीची स्टेज पण आरटी पीसीआर ३० टक्के केसेस मध्ये रुग्ण कोरोना संसर्गित असून ही निगेटिव्ह येऊ शकते. टेस्ट  फॉल्स निगेटिव्ह म्हणजे रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह तरीही आरटी पीसीआर टेस्ट निगेटिव्ह असे असू शकते. अशा वेळी आरटी पीसीआर परत एकदा करायला हवी. 
  7. पीसीआर  -,  आयजीएम  – ,    आयजीजी +   जुना संसर्ग झाला आहे , रुग्ण आता बरा झाला आहे. तसेच रिपोर्ट पॉजिटीव्ह येऊन १४ दिवस झाले असतील तर रुग्णाकडून इतरांना संसर्ग होण्याचा धोका नाही.
  8. पीसीआर  – ,  आयजीएम  + ,    आयजीजी +  रुग्ण रिकवरी फेज मध्ये आहे. पण  लक्षणे  सुरु असतील तर इतरांना संसर्गित करू शकतो.
  9. पीसीआर  -,  आयजीएम  – ,    आयजीजी –    संसर्गित झालेला नाही किंवा संसर्गाच्या अगदी सुरुवातीच्या पहिल्या ४ दिवसात रुग्ण आहे .

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

मालेगाव बदलते आहे

मालेगाव बदलते आहे

मालेगाव बदलते आहे मालेगावच्या परिस्थिती वर ‘मिशन मालेगाव’ सुचवणारा लेख सकाळ मध्ये लिहिला. यानंतर काहींनी धमक्या दिल्या, काहींनी ट्रोल केले तर वाचकांनी सत्य स्थिति सांगितल्या बद्दल कौतुक केले आणि हिम्मत वाढवली. पण एका व्यक्तिच्या वाचनात हा लेख आला आणि तो क्षण देशाचे वुहान ठरत असलेले कोरोना केंद्र – मालेगावचे  भवितव्य बदलणारा ठरला. ती व्यक्ति म्हणजे मालेगाव महापालिकेचे आयुक्त दीपक कासार. २८ एप्रिलला दीपक कासार यांनी मालेगाव महापालिका  आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली आणि  ३१ मे ला सकाळ मधील आमचा लेख प्रकाशित झाला . या लेखाकडे कासार यांनी टीकेच्या नजरेतून नव्हे तर संधी म्हणून पहिले. “ डॉक्टर तुम्ही आम्हाला मालेगावचा आरसा दाखवला, मी शपथ घेतो की ही परिस्थिति बदलवून दाखवेल, तुम्ही माझ्या सोबत आहात का?” असा मला दीपक कासार यांचा फोन आला. माझ्या गाठीशी असलेला माझ्या गावातील कोरोना प्रतिबंधाच्या ‘वैजापुर मॉडेल’च्या अनुभवा वरून काही उपाययोजना दीपक कासार यांना सांगितल्या व  अणि इतर तज्ञांशी  त्यांचा संपर्क करून दिला.  वैद्यकीय ज्ञान आणि  दीपक कासारांचे प्रशासकीय कौशल्याने कासार यांनी मालेगावचा कोरोना  आटोक्यात आणण्याच्या संकल्पपूर्तीला सुरुवात किली.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

घरोघरी जाऊन आढावा

                          मालेगाव मध्ये लोक तपासणी साठी बाहेर पडत नाहीत, मृत्यूचा आकडा आणि  बाधित जास्त आहेत या लेखातील माहितीच्या अनुषंगाने दीपक कासार यांनी घरोघरी आपल्या प्रशासनातील वेगळी व्यवस्था कामाला लावली आणि  एक धक्कादायक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. मुस्लीम समाजात मृत्यू  झालेल्यांच्या विधवेला फिदानी या धार्मिक नियमा अंतर्गत ४ महिने आणि आकरा दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी नसते. कोरोनाने मृत्यू झालेल्याच्या थेट संपर्कात आलेल्या या महिलांना त्यामुळे लक्षणे आली तरी घरातून बाहेर पडण्याची या प्रथेमुळे  सोय नव्हती. म्हणून यांच्या साठी कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करतील व त्यांना गरज वाटल्यास उपचार ही घरीच करण्यात येतील हा विश्वास दीपक कासार यांनी अशा मुस्लीम कुटुंबीयांना दिले.  अनेक जण सायलेंट हायपोक्सिया म्हणजे लक्षात येत नसलेले ऑक्सिजणचे प्रमाण कमी होणे याने दगावत आहेत हा मुद्दा मी माझ्या लेखात मांडला होता. यावर चर्चा करून दीपक कासार यांनी घरी असलेल्या कोरोना बाधितांना रोज पल्स ऑक्स तपासणी व अशा प्रत्येकाच्या थेट घरातच ऑक्सिजण सिलेंडर ही उपलब्ध करून दिले.

प्रतिसाद मिळू लागला

मुस्लीम वस्तीत त्यातच महिलांच्या तपासणी साठी मुस्लीम समाजातीलच  आशा सेविकांना जबाबदारी दिली.  यामुळे घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या स्क्रीनिंगला आधी मिळत नसलेला प्रतिसाद मिळू लागला. आम्ही लेखात इतर आजार बरे करा तरच कोरोनाचे मृत्यू टळतील या सूचनेला अनुसरून कोरोना सहित इतर जोखीम वाढवणाऱ्या आजारांचे स्क्रीनिंग ही कासार यांनी केले.

    मालेगाव मध्ये डॉक्टरांची कमतरता होती. २८३ डॉक्टरांना मालेगाव साठी आदेश निघाले होते. त्यापैकी फक्त ६ डॉक्टर रुजू झाले. मालेगाव मधील स्थानिक डॉक्टरांची नियुक्ती करायची झाल्यास जाहिरात देण्यास लॉकडाऊन मुळे काही मार्ग नव्हता. मग कासार यांनी मजीदींच्या भोंग्यावरून डॉक्टर व आरोग्य कर्मचारी नियुक्तीसाठी जाहिरात द्यायला सुरुवात केली. त्यातून एमबीबीएस सोबतच  आयुर्वेद, होमिओपॅथी व त्यातच मुस्लीम समाजातील युनानी डॉक्टर रुजू होण्यास तयार झाले. डॉक्टरांसह इतर काम करणाऱ्यां बरोबर रोज उत्तम प्रतीची राहण्याची सोय, हवे तसे आणि  हवे ते जेवण आणि  वागणुकीत मान सन्मान, त्यांनी सांगितलेली सूचना लगेच मान्य करणे यामुळे या पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांचा आत्मविश्वास वाढला. इतर अनेक ठिकाणी प्रशासन विरुद्ध डॉक्टर वादाची ठिणगी कासार यांनी मालेगाव मध्ये पडू दिली नाही.

रुग्णांना सकस आहार

 कोविड केअर सेंटर गावा बाहेर असल्याने आम्हाला मुस्लीम समाजाला भीती वाटते आणि  स्त्रियांना अशा ठिकाणी तर आम्ही मुळीच पाठवू शकत नाही असे मत काहींनी  बोलून दाखवले. लगेचच सरकारी लाल फितीचा कारभार बाजूला ठेवून कासार यांनी जागा बदलून गावाच्या मध्य वस्तीतील कॉलेजेस ताब्यात घेतली व तिथे अलगीकरण ( आयसोलेशन ) सोय निर्माण केली. तोच तो रोजचा पोहे , उपमा नाश्ता बंद करून या रुग्णासाठी उच्च प्रथिने युक्त नाश्ता व दिवसाला प्रथिने १ ग्राम प्रतिकिलो गरज पूर्ण होईल असा सकस आहार या रुग्णांना उपलब्ध करून दिला. या साठी रोज सकाळी या रुग्णांचे डान्सिंग योगा वर्ग घेण्याची जबाबदारी डॉ. उज्वल कापडणीस यांनी स्वीकारली. दीपक कासार स्वतः या डान्सिंग योगा वर्गात सामील व्हायचे.

संशय दूर केला

 मालेगाव बदलते आहे डॉ.सचिन जोशी या पवित्र कोरोनाचे अभ्यासक असलेल्या शिक्षणतज्ञांनी समाजाला कुराणाचे दाखले देऊन प्रतिबंधाचे उपाय समजावून सांगितला.  मुस्लीम समाजाचा विश्वास जिंकणे गरजेचे आहे हे आम्ही लेखात नमूद केले होते. त्यासाठी दीपक कासार रोज मौलवींसोबत दुआ मागण्याच्या कार्यक्रमात सामील होऊ लागले. ‘कोरोना ही आमच्या विरोधात साजीश आहे, लॉकडाऊन असताना कोरोना मालेगावात येतोच कसा’ असे गैरसमज कासार यांनी प्रेमाने व समजावून सांगून खोडून काढले. या सगळ्या कामाच्या व्यापात दीपक कासार स्वतः ही कोरोना बाधित झाले. पण सुट्टी न घेता त्यांनी वर्च्यूअल ऑफिस चालू ठेवले. सातव्या दिवशी टेस्ट निगेटिव आल्यावर स्वतःलाच कोरोना मुक्तीचे रोल मॉडेल बनवण्याचे त्यांनी ठरवले. प्रत्येक मोहोल्ल्यात जाऊन त्यांनी मी कोरोना मुक्त झालो, तुम्ही ही पुढे या, प्रशासनाला साथ द्या आणि  कोरोना मुक्त व्हा असे छोट्या बैठकांमध्ये सांगायला सुरुवात केली.

खाजगी डॉक्टरांचे सहकार्य

        मालेगाव बदलते आहे प्रशासनाच्या समंजस दृष्टीकोणामुळे मालेगाव मधील खाजगी डॉक्टरांनीही उत्तम सहकार्य केले.  या दरम्यान रुग्ण वाहिकांचा तीव्र तुटवडा होता. शांतीलाल मुथा यांनी भारतीय जैन संघटने तर्फे  ११ रुग्णवाहिका दिल्या. पण रुग्णवाहिकेच्या सर्व चालकांनी नोकरी सोडून दिली होती. त्यासाठी चालकच भेटेना. मग कासार यांनी उर्दू मध्ये चालक पदासाठी जाहिराती दिल्या आणि  म्हणेल तितका पगार या तत्वावर तातडीने बेरोजगार तरुण चालकांना सेवेत रुजू करून घेतले. कोरोना मृताची संख्या सुरुवातीला खूप होती. म्हणून या मृतदेहांचे पॅकिंग / त्यांना वाहून नेणे यासाठी माणसेच मिळत नसत. त्यासाठी हे काम करणाऱ्यांना पूर्ण  वैयक्तिक सुरक्षेचे कवच, वाढीव मानधन, समुपदेशन करून हा प्रश्न ही सोडवला. या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हजे रोज रस्त्याने लागणारी अंत्ययात्रांची आणि  मृतदेहांची रांग कमी होताना दिसू लागली.  

८६० रुग्णसंख्या  ८२ वर

बघित रुग्णसंख्येचा  दुपटीचा काळ ४ दिवसावरून ९४ दिवस झाला . रोजचे ४ मृत्यू हे १ किंवा शून्य वर आले .  बरे होण्याचे प्रमाण ८२ % झाले व ८६० रुग्ण संख्या ८२ वर आली.  लढा अजून पूर्ण संपलेला नसला तरी अंतिम विजय मात्र नजरेच्या टप्प्यात आला आहे. 

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.

कोरोनासाठी तपासण्या करताना

कोरोनासाठी तपासण्या करताना...

कोरोनासाठी तपासण्या करताना कोरोनासाठी सध्या ४ प्रकारच्या तपासण्या अस्तित्वात आहे

आर टी – पीसी आर

कोरोनासाठी तपासण्या करताना सध्या आयसीएमार ने निश्चित निदाना साठी सांगितलेली टेस्ट म्हणजे आर टी – पीसी आर . ही टेस्ट कोरोना विषाणूच्या जनुकीय साहित्याला ओळखून नाक व घशातून घेतलेल्या स्वॅब मध्ये कोरोना सापडतोय का हे सांगते. या साठी स्वॅब फक्त नाकातून घेतल्यास अहवाल पाँजिटीव्ह येण्याची शक्यता ६३ % असते व घशातून घेतल्यास ३२ % असते. म्हणजे उर्वरित रुग्ण पाँजिटीव्ह असले तरी त्यांचा अहवाल निगेटिव येऊ शकतो. म्हणून स्वॅब हा नाक व तोंडातून दोन्ही ठिकाणाहून घेतला गेला पाहिजे म्हणजे पाँजिटीव्ह येण्याची शक्यता वाढते. तो घेत असताना डोळ्यातून पाणी यायला हवे इतका त्रास व्हायला हवा. म्हणजे रिपोर्ट नीट यावा असे वाटत असेल तर स्वॅब घेताना सहकार्य करा व स्वॅब घेणाऱ्याला माझी काळजी न करता तुमच्या पद्धतीने स्वॅब घ्या ही मोकळीक द्या.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

रॅपीड अँटीजीन टेस्ट 

ही नवी तपासणी असून कोरोना ची प्रथिने ओळखून यात विषाणू  निदान केले जाते. आरटी – पीसीआर प्रमाणेच ही टेस्ट ही नाक व घशातील स्वॅब मध्येच केली जाते. या टेस्ट चा फायदा असा आहे कि याचा अहवाल १५  मिनिटात येऊ शकतो. फक्त या टेस्ट ची समस्या अशी आहे कि ती कोरोनाचे निदान करण्याचे प्रमाण  आरटी – पीसीआर पेक्षा कमी आहे. म्हणजे जर या टेस्ट मध्ये रुग्ण पाँजिटीव्ह आला तर नक्कीच तो पाँजिटीव्ह ग्राह्य धरला जाऊ शकतो. पण निगेटिव आला तर एकदा आरटी – पीसीआर करून तो निगेटिवच आहे हे निश्चित करावे लागते.

ट्रुनॅट टेस्ट

अशा प्रकरची तपासणी आधी टी.बी व एच.आय.व्ही साठी वापरली जायची. या तपासणीत ही आरटी – पीसीआर प्रमाणे जनुकीय साहित्य ओळखण्याचे काम केले जाते. फरक इतकाच आहे कि हे काम मशीन द्वारे केले जाते व  मशीन खूप छोटे असते म्हणू ते कुठे ही वाहून नेता येते. तसेच निदानाचा अहवाल अर्ध्या तासात मिळू शकतो.

रॅपीड अँटीबॉडी टेस्ट

कोरोनासाठी तपासण्या करताना या तपासणी मध्ये प्रतिकारशक्ती दर्शवणारे अँटीबॉडी हे घटक मोजले जातात. पण या शरीरात ७ दिवसांनंतर निर्माण होतात. म्हणून या टेस्ट चे निदान करण्यामध्ये काहीही महत्व नाही. या अँटीबॉडी दोन प्रकारच्या असतात आयजी एम सात दिवसांनंतर पाँजिटीव्ह येते व आयजी जी १० ते १४ दिवसांनंतर तयार होते व पुढे अनेक दिवस शरीरात राहते. थोडक्यात आय जी एम पाँजिटीव्ह आल्यास नुकताच संसर्ग झाला आहे व आय जी जी पाँजिटीव्ह आल्यास आधी कधी तरी संसर्ग होऊन गेला आहे एवढेच कळते. ही चाचणी निदाना साठी नसून एखाद्या गावात , भागात , शहरात किती लोक आता संसर्गित झाले आहेत हे स्क्रीनिंग करून पुढील उपाय योजना ठरवण्यासाठी असते. ही चाचणी रक्तातून करता येते.

 इलायजा टेस्ट

 या टेस्ट मध्ये ही रॅपीड अँटीबॉडी टेस्ट सारखे अँटीबॉडीच तपासता येतात. सध्या भारतात फक्त आय जी जी मध्ये आधी होऊन गेलेल्या कोरोना चा संसर्ग तपासण्यासाठीच कीट उपलब्ध आहेत. म्हणून किती लोकसंख्या संसर्गित झाली आहे एवढेच ही तपासणी सांगते.

चाचणी आर. टी. पी. सी.आर रँपिड अँन्टीजीन ट्रुनॅट रँपिड  अँन्टीबॉडी इलायाजा
वापर निदान निदान निदान लोकसंख्येत संसर्गाचे प्रमाण तपासणे लोकसंख्येत संसर्गाचे प्रमाण तपासणे
किती वेळ लागतो २४ ते ४८ तास १५ मिनिटे १ तास ३० मिनिटे १ तास
कशी केली जाते घसा व नाकातील स्वब घसा व नाकातील स्वब घसा व नाकातील स्वब रक्त रक्त
किंमत रु. २८००/- रु. ४५०/- रु.१००० – १५००/- रु.६००/- निश्चित नाही

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

खोकल्याचे उपचार

खोकल्याचे उपचार

खोकल्याचे उपचार ताप, सर्दी खोकल्यानंतर बाळाचे वजन कमी होऊ शकते व शरीरात विटामिन ‘ए,’ ‘डी’ची कमतरता भासू शकते. त्यासाठी बाळ बरे झाल्यावर त्याला एक वेळा अधिक जेवण व विटामिन ‘ए’, ‘डी’ देणे गरजेचे असते.
सर्दी खोकल्याच्या उपचारासाठी अनेकदा अनावश्यक औषधे वापरली जातात. सर्दी खोकल्याचे उपचार कारणे पाहून करावे लागतात. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

व्हायरल ताप, सर्दी खोकला – 
बहुतांश खोकल्याचे रुग्ण हे साध्या सर्दी खोकल्यामुळेच असतात. त्यासाठी 

  • नाकात नॉर्मल सलाईनचे ड्रॉप्स व साधी खोकल्याची औषधे, सोबत ताप असल्यास तो नियंत्रणात आणण्यासाठी पॅरॅसिटॅमॉल वापरले तरी पुरेशी असतात. 
  • थोड्या मोठ्या मुलांनी घसा धरल्यास मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
  • खोकल्यासाठी मध व कोमट पाणी एकत्र किंवा वेगळे घेतले जाऊ शकते. 
  • ताप, सर्दी खोकल्यासाठी अँटिबायोटिक्स देण्याची गरज नसते.
  • अशा मुलांना ते खातील तितके अन्न द्यावे, बळजबरी करू नये, मात्र पाणी भरपूर पाजावे.
  • ताप, सर्दी, खोकला असणाऱ्या मुलांना पाण्याची वाफ दिली जाऊ शकते. (रुग्णालयात जाऊन मशीनमधून वाफ देण्याची गरज नसते.) 
  • ताप, सर्दी खोकला आपोआप बरा होणारा व जीवाला धोका नसणारा आजार आहे. तो एक आठवडा चालतोच, म्हणून सतत ताप, सर्दी, खोकला बरा होत नाही म्हणून डॉक्टर बदलत राहू नये. असे केल्याने औषधाचे ब्रँड बदलत राहतील व तणावामध्ये डॉक्टर अँटिबायोटिक्स सुरू करतील. 
  • सर्दी खोकल्याची औषधे लक्षणे पूर्ण नाहीशी करण्यासाठी नव्हे, ती कमी करण्यासाठी असतात.
  • नॉर्मल सलाईन सोडून इतर औषधे असलेल्या नाकांच्या ड्रॉप्समुळे नाक तात्पुरते कोरडे पडते. मात्र, रिबाउंड कंजेशन, म्हणजे परत नाक भरून येण्याची शक्यता असते. 
  • खोकला दाबणारी औषधे (कोडीन, फोलकोडीन, डेक्सट्रोमीथारफान) मुलांना डॉक्टरांच्या परवानगी शिवाय देऊ नयेत. 
  • खोकल्याच्या अनेक औषधात एकाच वेळी, खोकला दाबणारी, खोकला पातळ करणारी आणि खोकला बाहेर काढणारी अशी परस्परविरोधी अॅक्शन असणारे घटक असतात. म्हणून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय खोकल्याची औषधे देऊ नये. 
  • ताप, सर्दी खोकल्यानंतर बाळाचे वजन कमी होऊ शकते व शरीरात विटामिन ‘ए,’ ‘डी’ची कमतरता भासू शकते. त्यासाठी बाळ बरे झाल्यावर त्याला एक वेळा अधिक जेवण व विटामिन ‘ए’, ‘डी’ देणे गरजेचे असते. 

अॅलर्जीमुळे सर्दी, खोकला – 
खोकल्याचे उपचार यासाठी अँटिअॅलर्जिक, म्हणजे शरीरात अॅलर्जी कमी करणारी औषधे दीर्घकाळासाठी घ्यावी लागतात. यासाठी अॅलर्जी टेस्ट करून काही उपयोग होत नाही. त्यापेक्षा काय खाल्ल्याने सर्दी, खोकला होतो हे आईने निरीक्षण करून ठरवलेले योग्य. बाहेर, धुळीत जाताना मास्कचा वापर केल्यास अलर्जीचा त्रास कमी होतो. 

दमा – 
दम्यासाठी नियमित घ्यायच्या काळजी व्यतिरिक्त दम्याचा अॅटॅक आल्यावर तातडीने घ्यायचे औषध आणि अॅटॅक नसताना घ्यायचे औषध, असे दोन पंप मिळतात. हे पंप त्या-त्या वेळी वापरून दम्याचा खोकला नियंत्रणात येतो. याशिवाय दमा नियंत्रणात आणण्यासाठी दीर्घकालीन घेण्याची काही औषधे असतात. 

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.

बालकांमध्ये कावासाकी आजारासारखी लक्षणे

बालकांमध्ये कावासाकी आजारासारखी लक्षणे

बालकांमध्ये कावासाकी आजारासारखी लक्षणे भारतात लहान मुलांमध्ये कोरोना अगदी सौम्य स्वरूपाचा असून घातक नसला तरी काही ठिकाणी कावासाकी या आजारासारखी लक्षणे कोरोना संसर्गाच्या ३ ते ४ आठवड्यांनंतर दिसून आली आहेत.

कावासाकी डीसिज् काय आहे?
कावासाकी हा ५ वर्षाखालील मुलांना होणारा व रक्तवाहिन्या, हृदयावर परिणाम करणारा आजार आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोनामध्ये नेमके काय होते ?
कोरोनामध्ये कावासाकी डीसिज होत नाही पण त्या आजारासारखी लक्षणे येतात आणि या आजाराप्रमाणे काही काळासाठी हृदयाभोवती सूज येऊन उपचारांची गरज पडू शकते. याचे प्रमाण खूप कमी म्हणजे १ लाखात १ असले तरी हे लवकरात लवकर ओळखता आले आणि त्वरित उपचार सुरु करता आले तर त्याचा फायदा होतो व गुंतागुंत टळते. म्हणून हे सर्र्वाना माहित असणे आवश्यक आहे.

कोरोनामध्ये कावासाकी सदृश्य आजार नेमका कधी होतो ?
हा आजार कोरोना संसर्ग सुरु असताना नव्हे तर कोरोना संपून गेल्यावर तीन ते ४ आठवड्यांनंतर होतो.

कोरोनानंतरच्या कावासाकी सदृश्य आजाराची लक्षणे काय ?
बालकांमध्ये कावासाकी आजारासारखी लक्षणे ताप, अंगावर लालसर चट्टे, चिडचिड करणे, अस्वस्थ वाटणे ही कोरोना नंतरच्या कावासाकी सदृश्य आजाराची मुख्य लक्षणे आहेत. मुलाला कोरोना संसर्ग झाल्यावर ३ ते ४ आठवड्यांनंतर ही लक्षणे आली तर त्वरित आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा. कोरोना संसर्ग नसेल व घरातील कोरोना संसर्गित व्यक्तीशी संपर्क आला व ही लक्षणे आली तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घाबरून जाऊ नये. हा आजार कावासाकी नसून कावासाकीसारखा आहे, म्हणून मुलांवर कोरोना संसर्गानंतर लक्ष ठेवावे. याचे प्रमाण खूप कमी आहे व झाले तरी यावरउपचार करता येतात म्हणून मुळीच घाबरून जाऊ नये

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

कोरोना नियमित आढळणाऱ्या लक्षणांपेक्षा वेगळी लक्षणे

कोरोना नियमित आढळणाऱ्या लक्षणांपेक्षा वेगळी लक्षणे

कोरोना नियमित आढळणाऱ्या लक्षणांपेक्षा वेगळी लक्षणे आपल्याला सर्दी , खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास , वास व चवीची क्षमता कमी होणे , जुलाब उलट्या  व श्वास घेण्यास त्रास होणे ही लाख्ने माहित आहेतच पण अशी काही वेगळी लक्षणे आहेत जे कोरोना मध्ये दिसून येत आहेत .

यात सर्वात आश्चर्य आहे तापा शिवाय कोरोना. काही डॉक्टर ज्यांना कोरोना संसर्ग झाला त्यांना ताप आलाच  नाही व इतर लक्षणे दिसून आली.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • फक्त तीव्र स्वरुपाची डोके दुखी.
  • तीव्र पाठदुखी व शरीरातील स्नायू दुखणे, त्यातच पायाचे खालंच्या बाजूचे म्हणजे काफ मसल्स दुखणे.
  • फक्त थकवा येणे.
  • डोळे येणे.
  • सर्दी खोकला असलेला माणूस दर वेळी सर्दी खोकला झाल्यावर असतो तसा न राहता खूप जास्त थकल्या सारखा वाटणे व सुस्त वाटणे.
  • ज्येष्ठ व्यक्तीं मध्ये झोप जास्त येणे किंवा सकाळी लवकर झोपेतून न उठणे. दिवसा ही झोपल्यावर खूप वेळा उठवावे लागणे.
  • सांधे दुखी.
  • दोन दिवसात तब्येत झपाट्याने बिघडणे व लघवी कमी होणे.
  • थकवा येऊन चेहरा निस्तेज वाटणे.

कोरोना नियमित आढळणाऱ्या लक्षणांपेक्षा वेगळी लक्षणे ही सर्व लक्षणे सुरुवात असून बऱ्याचदा ताप, खोकला, सर्दी ही या नंतर सुरु होते. म्हणून अशा कुठली ही वेगळी लक्षणे असल्यास लगेच घाबरून जाऊ नये पण स्वतःला इतरांना पासून वेगळे ठेवावे व आयसोलेशन करावे. तपासणी अहवाल कदाचित निगेटिव्ह येईल पण तो पर्यंत स्वतः वर लक्ष ठेवावे व विलगीकरणात राहावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

कमी बोला, हळू बोला, कोरोना टाळा!

कमी बोला, हळू बोला, कोरोना टाळा!

कमी बोला, हळू बोला, कोरोना टाळा!

कमी बोला, हळू बोला, कोरोना टाळा! तुम्ही एक मीटरपेक्षा जास्त अंतरावर आहात आणि बंद खोलीत कोणी मोठ्याने बोलले तर तुम्हाला कोरोनाबाधित व्यक्तीकडून संसर्ग होऊ शकतो.

आपण खोकणे, शिंकणे या बाबतीत काळजी घेतो पण अजून एक गोष्ट आहे जी कोरोनाचा संसर्ग वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. ती म्हणजे बोलणे. अनेकांना मोठ्याने बोलण्याची सवय असते. त्यातच फोनवर बोलताना ग्रामीण भागात अजूनही असा समज आहे कि मोठ्याने बोलल्याशिवाय मोबाईलवर आवाज नीट जात नाही. म्हणून सार्वजनिक ठिकाणी मोबाईलवर अनेक जण मोठ्याने बोलत असतात. तसेच मोबाईलवर बोलताना किंवा समोरासमोर बोलताना समोरच्याला नीट कळावे म्हणूनही अनेकजण नेमका त्याच वेळी मास्क खाली करतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

संशोधन काय सांगते
कमी बोला, हळू बोला, कोरोना टाळा! तुम्ही एक मीटरपेक्षा जास्त अंतरावर आहात आणि बंद खोलीत कोणी मोठ्याने बोलले तर तुम्हाला कोरोनाबाधित व्यक्तीकडून संसर्ग होऊ शकतो. मोठ्याने बोलल्याने १००० मायक्रो ड्रॉपलेट हवेत सोडले जातात व मास्क नसेल आणि खोली बंद असेल तेव्हा ते एकमीटरपेक्षा जास्त अंतरावर पसरतात. तसेच विषाणू १४ मिनिटे म्हणजे हळू बोलण्याच्या तुलनेत जास्त वेळ हवेत राहतात. जर हळू आवाजात बोलले आणि मास्क लावलेला असला तर ही शक्यता खूप कमी होते.

बोलताना पुढील काळजी घ्या

  • समोरच्याला ऐकू जाईल एवढ्याच आवाजात हळू बोला.
  • फोनवर व समोरासमोर बोलताना मास्क खाली करू नका.
  • उलट मास्कने नीट नाक, तोंड झाकले आहे का हे तपासा व मग बोला.
  • कमी बोला, सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक बोलू नका. कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी ज्या गप्पा मारायच्या होत्या त्या घरी येऊन फोन वर किंवा व्हिडीओ कॉलवर मारा.
  • बोलताना एक मीटर पेक्षा लांब उभे राहा व चेहरा समोरासमोर येणार नाही असे उभे राहून किंवा बसून बोला.
  • कार्यालयात बैठक घ्यायची असल्यास दार, खिडक्या उघड्या ठेवा.
  • कोरोनाबाधित होम आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तीने समोरासमोर घरातील व्यक्तीशी बोलूच नये. काय हवे, नको ते बंद दाराआडून सांगावे कोरोनाबाधित व्यक्तीशी बोलायचेच असल्यास दोघांनी मास्क वापरून एकमेकांना ९० डिग्री मध्ये उभे राहून बोलावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.