कोरोना व्हायरसची सविस्तर लक्षणे – कोरोनाची तीव्र ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास हा आपल्याला माहित आहे. पण हा त्रास तीव्र किंवा गंभीर कोरोनाच्या रुग्णालाच होतो. ८५ टक्के लोकांना कोरोना संसर्ग झाला तरी एक तर साधा ताप आणि थोडा खोकला असा सौम्य स्वरुपाची लक्षण दिसतील. त्यातही काहींना असे ही होऊ शकते की काहीच लक्षणे आली नाहीत. म्हणून साधा खोकला, ताप, सर्दी असली तरी आपल्याला इतरांपासून लांब रहायचे आहे हे समजून घ्यावे.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
पुढील लक्षणे कोरोना व्हायरसची सविस्तर लक्षणे आहेत . पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी – थोडे थकल्या सारखे वाटेल तिसऱ्या दिवशी – ताप, थोडा खोकला आणि घशात खाजवल्या सारखे वाटणे किंवा खवखवणे. चौथ्या दिवशी – डोकेदुखी पाचव्या दिवशी – पोटाशी निगडीत लक्षणे , पोट दुखी , क्वचित जुलाब , खोकला थोडा वाढेल, ताप तेवढाच राहील किंवा वाढेल. सहाव्या, सातव्या दिवशी – अंगदुखी , थकवा वाढेल, डोकेदुखी कमी होईल, पोटाच्या तक्रारी राहतील, भूक कमी होईल. आठव्या , नवव्या दिवशी – सगळी लक्षणे ताप , अंगदुखी कमी होईल , खोकला मात्र तसाच राहील किंवा वाढू ही शकतो पण आठव्या किंवा नवव्या दिवशी मात्र जर त्रास वाढला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर मात्र इथे उपचारांची किंवा लक्ष ठेवण्याची. तसेच तपासणी करण्याची ही गरज वरील लक्षणांसोबत त्यातच सातव्या दिवशी नंतर किंवा या लक्षणांमध्ये कुठे ही ताप वाढत गेला किंवा खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असेल तरच आहे.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता