Articles

फळे भाज्यांसाठी सॅनिटायजर साबण वापरू नका!

By Amol Annadate

May 21, 2020

फळे भाज्यांसाठी सॅनिटायजर साबण वापरू नका! अनेक ठिकाणी फळे व भाज्या सॅनिटायजरने फवारणी करून किंवा साबणाने धुवून वापरली जात आहेत. हे करणे गरजेचे नाही व यामुळे शरीराला, आतड्यांना हानी होऊ शकते; तसेच बाजारात खास फळे, भाज्यांसाठी वेगळे सॅनिटायजरही विक्रीसाठी आले आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

हे विकत घेऊ नये व वापरू नये; तसेच सॅनिटायजरचा वापर फक्त हात, धातू व स्टील यांवरचे व्हायरस नष्ट करण्यासाठीच होतो म्हणून इतर कुठेही हे वापरू नये.फळे व भाज्यांवर कोरोना व्हायरस ४ ते ६ तास राहू शकतो. त्यामुळे यासाठी करण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे फळे, भाज्या आणल्यावर आणलेल्या पिशवीतच ६ तास घरा बाहेर ठेवल्या जाऊ शकतात. त्यांनतर त्यांना कोमट पाण्यामध्ये बेकिंग सोडा किंवा पोटॅशियम परमँग्नेट टाकून त्या पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून नंतर वाहत्या पाण्याखाली धुवून वापरल्या जाऊ शकतात. फळे, भाज्यांसाठी सॅनिटायजर, साबण वापरू नका!त्यानंतर शक्य असल्यास हेअर ड्रायरची गरम हवा फळ-भाज्यांवरून फिरवली जाऊ शकते. हेअर ड्रायर उपलब्ध नसेल, तर ही स्टेप वगळली तरी चालेल. केळी किंवा कांद्यासारख्या गोष्टी पाण्यात टाकल्या जाऊ शकत नाहीत व पाण्यात टाकल्यास खराब होऊ शकतात. या वस्तू ६ तासाने घरात आणाव्या व केळी एक दिवसानी, कांदे तीन दिवसांनी वापरावे. तोपर्यंत घरात बंद डब्यात पडू द्यावे. फळे, भाज्या आणण्यासाठी पेपरच्या बॅग वापरणे योग्य ठरेल म्हणजे, त्या घराबाहेर जाळून टाकल्या जाऊ शकतात. पेपर बॅग वापरली जात नसेल, तर इतर बॅगा घराबाहेरच ठेवाव्या

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता