Articles

अनलॉक होत असतानाचा मानसिक तणाव कसा हाताळावा?

By Amol Annadate

June 09, 2020

अनलॉक होत असतानाचा मानसिक तणाव कसा हाताळावा? “लॉकडाऊन-५ मध्ये प्रवेश करताना आता अनलॉक होण्यास आपण सुरू झालो आहोत. एकीकडे आयुष्य पूर्वपदावर कधी येईल असे वाटत असताना; मात्र जसे लॉकडाऊन मध्ये घरी बसण्याचा ताण आला होता, तसाच आता बाहेर पडतानाही संसर्गाची भीती, तणाव अनेकांना जाणवतो आहे.काम करण्याच्या जागेवर बदलले नियम, बाहेर सार्वजनिक स्वच्छता कशी असेल, गर्दीचा सामना करावा लागेल का, संसर्गाचा धोका असेल का अशी भीती अनेकांच्या मनात असल्याने कामाला लागताना आणि न्यू, नॉर्मल स्वीकारताना तणावाचा सामना अनेकांना करावा लागतो आहे. सर्व प्रथम याचे स्पेनमध्ये निदान झाले आणि याला तणावाला ‘री एन्ट्री पॅनिक सिंड्रोम’ असे नाव देण्यात आले. तीन महिने घरात सर्वांच्या काम करण्याच्या सवयी आणि दिनचर्या बदलली आहे. त्यामुळे नवे आयुष्य व कामाची पद्धत स्वीकारण्यास अनेकांना त्रास होणार आहे. यासाठी पुढील गोष्टी समजून घ्या व करा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता