आरोग्य सेतू अॅप कसे वापरावेआरोग्य सेतू हे कोरोना केसचा संपर्कात आलेल्यांची माहिती मिळवण्यासाठी बनवलेले भारत सरकारचे अधिकृत अॅप आहे. हे अॅप आता हवाई प्रवासा दरम्यान व काही शासकीय कार्यालयांमध्ये सक्तीचे करण्यात आले आहे. हे अॅप पुढील प्रमाणे वापरता येईल
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
- अॅप डाउनलोड करण्यासाठी ते गुगल किंवा अॅपलच्या प्ले स्टोर मधून डाउनलोड करावे.
- लगेचच अॅप तुम्हाला तुमच्या पसंतीची भाषा विचारेल. मराठीत सह अॅप ११ भारतीय भाषेत उपलब्ध आहे.
- रजिस्टर असे म्हंटल्यावर आपले लोकेशन म्हणजे आपण कुठे असणारा आहोत याला एक्सेस करण्याची अॅप ला परवानगी द्या.
- पुढे मोबाईल नंबर अॅप मध्ये भरावा लागतो. या नंतर एक ओटीपी नंबरचा संदेश मोबाईलवर येईल जो भरला कि अॅप सुरु होईल.
- एकदा अॅप सुरु झाले कि तुम्हाला ब्लूटूथ सतत चालू ठेवायचे आहे तसेच लोकेशन शेअरिंग च्या फोन मधील सेटिंग ला ‘ ऑलवेज ‘ असे ठेवायचे आहे.
- आरोग्य सेतू अॅप कसे वापरावे सर्व प्राथमिक माहिती भरल्यावर अॅप तुम्हाला गेल्या ३० दिवसातील परदेश प्रवासाला बद्दल विचारते.
- यानंतर तुम्हाला सध्या ची लक्षणे असल्याची पडताळणी काही प्रश्न विचारून अॅप करते तसेच तुम्ही स्वयंसेवक म्हणून कोरोनाच्या साथीत काम करण्यास तयार आहात का हे ही विचारते. तयार असल्यास परत २० सेकंदात तुमची स्व चाचणी साठी काही आरोग्य बाबत प्रश्न विचारते.
- जर लक्षणांना वरून तुम्हाला कोरोना असल्याची शंका असल्यास तसे सांगितले जाते व टेस्ट करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
- यानंतर जर तुमचा कोरोनाच्या रूग्णाशी संपर्क येत असेल तर तुम्हाला अॅलर्ट केले जाते किंवा तुमचा नुकताच संपर्कात आलेला कोरोना बाधित झाला असेल तर तुम्हाला त्या विषयी अॅलर्ट केले जाते. यानंतर विलगीकरण कसे करायचे याच्या सूचना दिल्या जातात.
- यासोबतच देश भरातील कोरोना साठीच्या हेल्पलाईन नंबर्सची माहिती या अॅप वर दिलेली आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कोरोना विषयीचे सर्व ट्वीट ही अॅप वर दिसतात.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता