फक्त गरम किंवा कोमट पाणी हे कोरोना वर उपचार नव्हे! नुकताच कोरोना सदृश लक्षणे व मधुमेह हा कोरोनाची शक्यता वाढवणारा घटक असलेल्या एका रुग्णाचा संपर्क झाला. शासनाच्या फिवर क्लिनिकला जाऊन तपासणीचा सल्ला देऊनही अशा वेळी फक्त शक्य तितके गरम पाणी प्या असा सल्ला वाचल्याने एवढेच करून मी ठीक होईल अशा या रुग्णाच्या हट्टामुळे जवळचे नातेवाईक ही वैतागले. कोमट / गरम पाण्यासह अनेक उपचारांबद्दल समाज माध्यमांवर सल्ले दिले जात आहेत. कुठल्या ही ताप, खोकला, सर्दीच्या रुग्णाने शासनाच्या जवळच्या फिवर क्लिनिक किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन दाखवावे. तसेच संशयित व कोरोना बाधित लक्षण विरहीत तसेच लक्षणांसह असलेल्या रुग्णाचे नेमके काय उपचार करायचे हे मार्गदर्शक तत्वांप्रमाणे अॅलोपॅथीचे उपचार ठरलेले आहेत . गरम पाणी, आयुर्वेद, होमिओपथी हे प्रतिबंधासाठी ठीक आहेत व त्यासाठी जरूर वापरावे तसेच उपचार म्हणून ही सोबत घेण्यास हरकत नाही. आयुष चे काय उपचार अॅलोपॅथी सोबत घ्यायचे आहेत हे ठरवण्यासाठी शासनाने एक कृती गट ही स्थापन केला हे व तो लवकरच या विषयी निर्णय घेईल . पण हे इतर व आयुष उपचार सुरु करायचे म्हणजे अॅलोपॅथीचे उपचार बंद करायचे असे नाही. तसेच डॉक्टरांच्या माहिती शिवाय समाजमाध्यमांवर सांगितले जाणारे घरगुती उपचार अॅलोपॅथीचे उपचार बंद करून घेऊ नये. फक्त घरगुती उपचार घेत घरी बसने खूपच धोका दायक ठरू शकते .
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
फक्त गरम किंवा कोमट पाणी हे कोरोना वर उपचार नव्हे! हे सर्व कोरोनावर अॅलोपॅथी मध्ये उपचारच नाहीत या गैरसमजा पोटी होते आहे. उपचार नाहीत असे म्हणण्यापेक्षा हा व्हायरल आजार असल्याने इतर कुठल्याही व्हायरल आजरा प्रमाणे वेळेप्रमाणे आपोआप बरा होणारा आजार आहे. पण आजार बरा होत असताना शरीराला, फुफ्फुस व इतर आजारांना इजा होऊ नये म्हणून रुग्णाचे निरीक्षण आवश्यक असते. तसेच कोरोनावर उपचार ही आहेत व काहीं उपचारांवर संशोधन सुरु आहे . बरीच औषधे ही काही प्रमाणात विषाणूची संख्या कमी करतात व ती वापरली जात आहेत. तसेच संसर्गा नंतर शरीराला इजा होण्याची चिन्हे दिसत असली तर ती इजा कमी करणारी किंवा रोखणारी औषधे ही दिली जात आहेत. काही रुग्णांना केवळ ऑक्सिजन कमी पडते व तेवढे काही दिवस दिले तरी ते बरे होतात. म्हणूनच उपचार नाहीत या भ्रमात केवळ घरगुती उपाय करत कोणीही घरी थांबू नये.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता