गर्भवती महिलांचा कोरोना पासून बचाव गर्भवती स्रीने तपासणी साठी रुग्णालयात जावे का, हा प्रश्न अनेकांना पडतो आहे. ९ महिने पूर्ण होई पर्यंत जर बाळाच्या हालचाली नॉर्मल जाणवत असतील, रक्तस्राव होत नसेल, व इतर काही त्रास नसेल तर प्रसुतीच्या तारखे पर्यंत रुग्णालयात जाऊ नये.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
सध्या पुढील काही अढळल्यासच स्रीरोगतज्ञांकडे जावे –
१. पोट खूप दुखत असल्यास. २. योनीमार्गातून रक्त स्त्राव/बाळाभोवतीचे पाणी बाहेर येणे. ३. बाळाच्या हालचाली कमी जाणवणे ( दिवसातून १२ वेळा किमान बाळ लात मारते, हे मोजल्यास व पोटात बाळाचे लाथ मारण्याचे प्रमाण १२ पेक्षा कमी असल्यास) ४. ९ महिने भरल्यावर
पुढील गोष्टींसाठी स्रीरोगतज्ञांचा फोनवर सल्ला घ्यावा –
- उलट्या, साधा सर्दी खोकला, पाठदुखी , बद्धकोष्ठता
सोनोग्राफी साठी कधी जावे –
१. गरोदर झाल्यापासून एकदा ही सोनोग्राफी केलेली नसल्यास. २. गरोदर पणात इतर आजारांमध्ये जास्त जोखीम असल्यास व बाळाला/आई ला धोका असल्यास तीन महिन्यातून एकदा ३.बाळाची हालचाल जाणवत नसल्यास. ४. एकोणिसाव्या आठवड्यात बाळाच्या जन्मजात व्याधी तपासण्यासाठी अॅनॉमॉली स्कॅन
गर्भवती महिलांचा कोरोना पासून बचाव गरोदर असताना नियमित ब्लड प्रेशर मोजणे आवश्यक असते. त्यासाठी घरगुती इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे उपलब्ध असेल तर तपासावे. किव्हा डोके दुखत असेल तरच आपल्या डॉक्टर कडे रक्तदाब तपासण्यास जावे . याशिवाय कोरोना टाळण्यासाठी वारंवार हात धुणे , सोशल डीस्टन्सिंग , घरा बाहेर न जाने हे सगळे नियम गरोदर स्रीला ही लागू आहेत.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता