लहान मुलांसाठी विटॅमिन डी उपयोगी मोठ्या व्यक्तीं प्रमाणेच लहान मुलांना अगदी जन्मापासून विटॅमिन डी ची गरज असते. हाडांसोबतच प्रतिकारशक्ती व त्यातच श्वसनाच्या जंतू संसर्गा विरोधात विटॅमिन डी चे अनन्य साधारण महत्व आहे. दमा असलेल्या मुलांमध्ये ही विटॅमिन डी ची पातळी नॉर्मल राहणे गरजेचे असते.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
लहान मुलांसाठी विटॅमिन डी उपयोगी आईच्या दुधात इतर सर्व घटक असतात पण विटॅमिन डी मध्ये मात्र ते कमी पडते. तसेच सकाळी १० ते ४ अर्धा तास मुलांना उन्हात ठेवणे ही व्यवहारिक नाही. त्यामुळे सर्व वयोगटातील लहान मुलांना विटॅमिन डी ची गरज असते. याला अपवाद असू शकतात असे नवजात बालक ज्यांना रोज उन्हात अंघोळ घातली जाते. जन्मा नंतर पहिल्या महिन्यात बाळाला तेलाने मसाज करून उघड्यावर सूर्यप्रकाशात अंघोळ घातली आणि १० मिनटे सूर्य प्रकाश मिळू दिला तर मात्र त्यांना विटॅमिन डी चे औषध देण्याची गरज पडणार नाही असे लहान मुलांचे संप्रेरक तज्ञ डॉ. तुषार गोडबोले सांगतात. पण पहिला महिन्यात सूर्यप्रकाश मिळत नसल्यास मात्र जन्मापासूनच विटॅमिन डी चे औषध ४०० IU रोज एक वेळा पहिले वर्ष द्यावे. या नंतर रोज ४०० ते ६०० IU प्रती दिन देणे अपेक्षित आहे. पण रोज औषद देण्याचे कोणाला ही शक्य होत नाही व लक्षात ही राहात नाही. या साठी एक वर्षा नंतर ६०,००० IU आठवड्यातून एकदा ६ आठवडे व नंतर दर ऋतू बदलला म्हणजे प्रत्येक वेळी ऋतू बदलला की विटामिन डी एकदा द्यायला हवे. ढोबळपणे दर तीन महिन्यातून एकदा ६०,००० IU असा हा डोस येतो. याशिवाय मुलांचे उन्हात खेळण्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे.लहान मुलांसाठी विटॅमिन डी उपयोगी शाळांमध्ये खेळण्याचे तास हे सकाळी १० ते दुपारी ४ च्या दरम्यान ठेवण्यात यावे. एरवी कुठल्या ही गोष्टी साठी रक्त घेतले जात असेल तेव्हा मुलांच्या रक्तातील विटामिन डी चे प्रमाण तपासून पाहावे. पण आवर्जून हे तपासण्यासाठी रक्त घेऊ नये. हे प्रमाण ५० ng / ml च्या वर असल्यास पुरेसे समजावे. त्या खाली असल्यास पूर्ण उपचारासाठी वया प्रमाणे डोस द्यावा लागतो. त्यासाठी आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता