अनेकजण वापरात असलेल्या नेबुलायझरपासून सावधान

अनेकजण वापरात असलेल्या नेबुलायझरपासून सावधान

अनेकजण वापरात असलेल्या नेबुलायझरपासून सावधान आपल्याकडे वर्षानुवर्षे सर्दी खोकल्यासाठी रुग्णालयात किंवा घरी नेबुलायझरने  वाफ घेणे सुरु आहे. खर तर दमा व अलर्जी सोडून इतर नियमित येणाऱ्या ताप, सर्दी, खोकल्याला अशा नेबुलायझर मधून वाफ घेण्याची गरज नसते. यातून बाळाच्या पालकांना फक्त खोकल्यासाठी काही तरी करत असल्याचे मानसिक समाधान मिळत असते.आता तर दम्याच्या रुग्णांना ही फक्त इन्हेलर म्हणजे मीटर्ड डोस इन्हेलरचाच वापर करावा व त्यांच्यासाठी ही नेबुलायझरची गरज नाही असे आतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे सांगतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

अनेकजण वापरात असलेल्या नेबुलायझरपासून सावधान सध्या कोरोना साथीच्या काळात तर हॉस्पिटल / क्लिनिकच्या वेटिंग रूममध्ये कोपऱ्यात असलेल्या एकाच नेबुलायझर मधून अनेक मुलांना नेब्यूलायजेशन देणे हे घातक ठरू शकते. अनेकजण वापरात असलेल्या नेबुलायझरपासून सावधान या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातून साध्या सर्दी खोकल्यासाठी नेबुलायझर ही परंपराच हद्दपार करावी. जर दमा , अॅलर्जी नेबुलायझर वापरण्याची वेळ येतच असेल तर आपल्या बाळासाठी नवा आणि वेगळा नेबुलायझर वापरावा. नेबुलायझरचा सर्वात मोठा धोका म्हणजे जर कोरोना बाधित रुग्ण इतरांसमोर नेब्यूलायजेशन  घेत असेल तर यातून उडणारे श्वासाचे कण हे अधिक दूरवर उडून इतरांना ही संसर्ग करू शकतात. तसेच निश्चित निदान झालेल्या रुग्णाला नेबुलायझर चा वापर करावा लागलाच तर तो बंद खोली मध्येच करावा व नंतर ही जागा सोडियम हायपोक्लोराईट ने निर्जंतुक करून घ्यावी. घरात दोन मुले असतील तर त्यांचे ही नेबुलायझर एकमेकांना वापरू नये. दम्याचे रुग्ण असतील तर इन्हेलर ही प्रत्येकाने ज्याचे त्याचे वापरावे. नेबुलायझर प्रमाणे इन्हेलर मधून श्वासाचे कण बाहेर उडत नाहीत.  या बाबतीत एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे उपयोगी असलेल्या इन्हेलर बद्दल पालकांना याची सवय लागेल का म्हणून शंका असते. पण फार से उपयोगाचे नसलेले नेबुलायझर मात्र त्यांना हवेहवेसे असते. कोरोनाच्या निमित्ताने हे सर्व गैरसमज दूर झाले पाहिजे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता