ए.सी.वापरू शकतो कि नाही?

ए. सी. चालू करू शकतो की नाही

ए.सी.वापरू शकतो कि नाही? यावर बरीच चर्चा चालू आहे. एका रूम मधील ए.सी. असेल तर त्या माध्यमातून कोरोना पसरू शकतो या विषयी कुठला ही पुरावा नाही व याची शक्यता नाही. पण सेन्ट्रल ए.सी ज्यातून सगळी कडे फिरून हवा जाते , या विषयी अजून निश्चित माहिती नाही. पण सेन्ट्रल पेक्षा वयक्तिक रूम साठीचा ए.सी. चांगला . पण वापरण्या अगोदर हा ए.सी. ही स्वच्छ करून घ्यावा.  अस्वच्छ ए.सी मुळे दमा, ॲलर्जीक खोकला, ॲलर्जीक सर्दी वाढते व ताप–सर्दी–खोकला व त्यातच लीजोनेल्ला , असीनॅटोबॅक्ट हे  निमोनिया करणारा बॅक्टीरीया ए.सी मधून पसरतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

ए.सी.वापरू शकतो कि नाही? उन्हाळा नुकताच सुरु झाल्याने या दिवसात अचानक अनेक महिने बंद असलेले ए.सी. चालू होतात. बऱ्याचदा हे ए.सी. स्वच्छता न करता चालू केले जातात. यात अनेक दिवस अडकलेले ॲलर्जीन्स ही बाहेर पडतात. आणि दमा, ॲलर्जी बळावते. वैद्यकीय संशोधनात असे सिध्द झाले आहे कि अस्वच्छ ए.सी. मध्ये लीजनेल्ला, असीनॅटोबॅक्टर हे निमोनियाची लागण करणारे जंतू असतात .

ए.सी. ची स्वच्छता घरीच पुढील प्रमाणे करा –

ए.सी.चालू करू शकतो कि नाही? आधी ए.सी. चे स्वीच बंद असल्याची खात्री करून घ्या. ए.सी. उघडण्या अगोदर चेहरा , डोके झाकून घ्या. मास्क व गॉगलचा वापर करा .   ए.सी. उघडा. त्यातील जाळी काढून पाण्यामध्ये दोन तास भिजवा. त्यानंतर जुन्या टूथब्रशने ती स्वच्छ घासून घ्या. त्यानंतर एक दिवस उन्हात ही जाळी वाळू द्या. ए.सी चा आतील भाग हेअर ड्रायर ने गरम हवा मारून ५ ते १० मिनिटे स्वच्छ करून घ्या. या वेळी चेहरा शक्यतो दुसऱ्या बाजूला घ्या व हेअर ड्रायर फिरवताना उडणारी धूळ डोळे, नाका तोंडात जाणार नाही याची काळजी घ्या. या साठीच मास्क व गॉगलचा वापर करा.  मग ती परत बसवूनच या उन्हाळ्याचा पहिला-पहिला ए.सी चालू करा. या नंतर दर महिन्याला एकदा जाळी काढून झटकून स्वच्छ करायला विसरू नका.

सदरील माहिती आपण लोमत मध्येही वाचू शकता