सार्वजनिक फवारणी आणि निर्जंतुकीकरण कक्ष निरुपयोगी

सार्वजनिक फवारणी आणि निर्जंतुकीकरण कक्ष निरुपयोगी

सार्वजनिक फवारणी आणि निर्जंतुकीकरण कक्ष निरुपयोगी सध्या राज्यात अनेक सार्वजनिक ठिकाणी सोडीयम हायपोक्लोराईटची फवारणी तसेच अशी फवारणी सुरु असलेले चेम्बर्स बनवून त्यातून माणसांनी जायचे असे प्रकार सुरु आहेत. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर फवारणी करून कोरोनाला अटकाव करणे अवघड तर आहेच याशिवाय त्याचे दुष्परिणाम ही आहेत. कोरोना हवेतून दूरवर पसरत नाही. तो ८ मीटर हवेत उडून नंतर खाली बसतो. म्हणून हवेत फवारणीचा उपयोग नाही. सार्वजनिक आरोग्यात उपाय योजना करताना परिणामकारकता – खर्च – दुष्परिणाम हे त्रैराशिक मांडावे लागते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना ची कॅरीअर व्यक्तीने नेमके कुठे हात लावले हे माहित नसताना अख्खे गाव , विभाग फवारणी करणे उपयोगाचे तर नाहीच पण याने आर्थिक निधी चा अपव्यय ही होतो आहे. फवारणी करायचीच असेल तर फक्त ज्या बिल्डींग मध्ये रुग्ण सापडला किंव एखादा छोटा भाग जिथे खूप रुग्ण सापडले असे हॉट स्पॉट मध्ये त्या मानाने याचा थोडा फार उपयोग तरी होईल.सार्वजनिक फवारणी आणि निर्जंतुकीकरण कक्ष निरुपयोगीवयक्तिक पातळीवर घर स्वच्छ करण्यासाठी ग्लव्ज, गॉगल, मास्क घालून  घरात सोडियम हायपोक्लोराईटने स्वच्छता करण्यास हरकत नाही.सार्वजनिक फवारणी आणि निर्जंतुकीकरण कक्ष निरुपयोगी तसेच ज्या रुग्णालयात रुग्ण सापडला तिथे ही फवारणी करण्यास हरकत नाही. सार्वजनिक रीत्या फवारणी केल्याने डोळे , त्वचा, नाकात चुरचुरणे , घसा खवखवणे / दुखणे , खोकला असे दुष्परिणाम होऊ शकतात .  निर्जंतुकीकरण कक्ष बनवून त्यातून माणस जात आहेत , त्याबद्दल ही असेच आहे. संसर्गाचा सगळ्यात मोठा धोका हा कोरोना बाधित व्यक्ती शी संपर्क येऊन त्याच्या खोकण्या, शिकण्यातून  आहे. तसेच त्याने हात लावला त्याच ठिकाणी हात लावण्यातून आहे. फक्त निर्जंततूकीकरण कक्षातून जाऊन हा धोका कसा टळेल. काहींनी चक्क हँड सॅनीटायझरची ही या कक्षातून पूर्ण अंगावर फवारणीची सोय केली आहे. या सर्व गोष्टींचे कक्षातून जाणाऱ्या व्यक्तीवर दुष्परिणाम आहेत. जागतिक आरोग्य संघटना व सीडीसी ने ही अशा कक्षांना मान्यता दिलेली नाही. तमिळ नाडू राज्याच्या आरोग्य विभागाने शासनाचा परिपत्रक काढून असे कक्ष बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता