भाज्या, धान्य, किराणा, दुध घेताना काळजी

भाज्या धान्य किराणा दुध घेताना काळजी जर कोरोना बाधित व्यक्तीला अजून माहित नसेल कि तो कोरोना ग्रस्त आहे. आणि त्याने हाताळलेल्या वस्तू आपण हाताळल्या तर त्यामाध्यमातून कोरोना पसरू शकतो. यासाठी पुढील काळजी घ्यावी –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • भाज्या धान्य किराणा दुध घेताना काळजी फळ भाज्या स्वीकारताना शक्यतो त्या हात न लावता थेट पिशवीत टाकायला सांगाव्या .
  • आणलेल्या भाज्या घरात आल्या आल्या एका भांड्यात पाण्यात ओताव्या.
  • पिशवी घरात न ठेवता घरा बाहेर किंवा छतावर उन्हात टाकावी व परत जाताना तीच पिशवी न्यावी.
  • पाले भाज्या पाण्यात ( शक्यतो कोमट ) काही वेळ पूर्ण  बुडवून ठेवाव्या व फळ भाज्या, फळे १२ तास पाण्याच्या मोठ्या भांड्यात ठेवाव्या.
  • पाण्यातून बाहेर काढल्यावर सर्व भाज्या व फळांवर हेअर ड्रायर च्या गरम वाऱ्या खालून जाऊ द्यावे (वेळ – या गरम वाऱ्याच्या चार पाच झुळुका प्रत्येक फळ भाजी वरून जाईल असे पाहावे )
  • या काळात सध्या कच्या भाज्या मुळीच खावू नये. शिजवूनच खाव्या. फळे खाण्या आधी परत धुवून घ्यावे .
  • दुध – पिशवीतून घेत असाल तर घरात आणल्यावर पिशवी बाहेरून धुवून घ्यावी.
  • जर गवळ्या कडून घेत असाल तर स्वच्छ भांड घरा बाहेर ठेवाव आणि गवळ्या ला भांड्याला न शिवता दुध भांड्यात टाकायला सांगाव.
  • घेतलेले दुध घरात आणल्या आणल्या उकळून घ्यावे.
  • गवळ्यांनी सर्दी खोकला असल्यास दुध द्यायला जाऊ नये , इतर स्वस्थ व्यक्तीची व्यवस्था करावी. गवळ्यांनी शक्य झाल्यास मास्क वापरावा व दोन घरांच्या मध्ये हँड सॅनीटाझर वापरावा . तो गवळ्याला परवडत नसेल तर दुध घेण्याऱ्या घरांनी दुध घेतल्यावर गवळ्याच्या हातावर आपल्या घरातील हँड सॅनीटायझर टाकावा.
  • भाज्या धान्य किराणा दुध घेताना काळजी किरणा माल आणताना भाजी घेतानाचे सगळे नियम व  पिशवी बाहेर किंवा छतावर ठेवण्याचा नियम पाळावा तसेच किराणा सामान एक दिवस न वापरता तसेच राहू द्यावे. २४ तासाने वापरायला काढावे.
  • कुठले ही बाहेरचे सामान आणल्यावर घरात आल्या आल्या हात धुवायला विसरू नये.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता