हॉस्पिटल मध्ये जाताना घ्यावयाची काळजी

हॉस्पिटल मध्ये जाताना घ्यावयाची काळजी

हॉस्पिटल मध्ये जाताना घ्यावयाची काळजी कोरोनाची साथ सुरु असताना डॉक्टर कडे जावे की जाऊ नये. या विषयी स्पष्ट मार्गदर्शन नसल्याने रुग्ण गोंधळून गेले आहेत. यासाठी पुढील मार्गदर्शक तत्व लक्षात घ्यावी.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

१. साधे आजार असतील तर शक्यतो आपल्या डॉक्टरला फोन वर संपर्क करावा व आपली लक्षणे सांगावी. २. सध्या महाराष्ट्र मेडिकल काऊन्सील ने फोन वर औषधे देण्याची परवानगी दिली आहे. म्हणून जर लक्षणे साधी असली आणि डॉक्टरांना वाटले की हा आपोआप बरा होणारा आजार आहे तर ते फोन वर प्रिस्क्रिप्शन देतील. ३. जर त्रास जास्त असेल तर डॉक्टरांची वेळ घेऊन त्यांच्याकडे जावे. ४. डॉक्टर कडे जाताना कमीत कमी लोकांनी सोबत जावे. ५. जर सर्दी, खोकला किंवा श्वसन संबंधित कुठला ही त्रास असेल तर तोंडावर मास्क लावून हॉस्पिटल मध्ये जावे. ६. हॉस्पिटलच्या आत जाताना हात धुण्याची व्यवस्था असेल तर हात धुवा किंवा हँड सॅनीटायजर चा वापर करा. ७. डॉक्टरांच्या केबिन मध्ये जाताना शक्यतो आजारी व्यक्तीनेच आत जावे.

८. हॉस्पिटल मध्ये जाताना घ्यावयाची काळजी डॉक्टरशी बोलताना ही सोशल डीस्टन्सिंग म्हणजे १ मीटर पेक्षा जास्त अंतरावरून माहिती सांगावी. ९. डॉक्टर तपासणी करत असताना चेहरा डॉक्टर उभे आहेत त्याच्या दुसऱ्या बाजूला वळवून ठेवावा. १०. डॉक्टर तपासत असताना खोकला आल्यास लांब होऊन किंवा आपल्या बाजू वर खोकला करा. ११. हॉस्पिटल मध्ये कुठल्या गोष्टीला फार हात लावू नका. १२. हॉस्पिटल मधून घरी गेल्यावर परत हात धुवावे. १३. या काळात सहज भेटायला म्हणून हॉस्पिटल ला जाऊ नये. १४. दाखल असलेल्या रूग्णा सोबत ही कमी नातेवाईकांनी थांबावे. १५. गरोदर महिला यांनी निर्मित प्रसूती पूर्व तपासणी काही त्रास नसल्यास लांबणीवर टाकावी. १६. लहान मुलांचे लसीकरण सध्या काही काळ लांबणीवर टाकावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता