माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष काळजी

माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष काळजी

माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष काळजी गेली दोन महिने फिल्ड वरून वार्तांकन करणारे प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यामांचे प्रतिनिधी हे ही पहिल्या फळीत काम करणारे कोरोना योद्धेच आहेत. यापैकी काही माध्यम प्रतिनिधी हे कोरोनाग्रस्त ही झाले आहेत. माध्यमांना या साठी काही बदल करता येतील व प्रतिनिधींनी पुढील काळजी घ्यावी  –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

 • माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष काळजी वार्तांकन करताना बुमरची लांबी तीन फुट वाढवली असली तरी ती पुरेशी नाही व त्याने सोशल डीस्टन्सिंगच्या निकषाची पूर्तता होत नाही. ती किमान पाच ते सहा फुट करून फोल्डेबल बुमर बनवावा. कारण मुंबई सोडून इतरत्र वार्तांकन करणारे प्रतिनिधी दुचाकीवर फिरतात व फोल्डेबल बुमर नसल्यास मोठा बुमर दुचाकी वर घेऊन फिरणे अवघड जाईल. 
 •  बुमर पासून १ फुट लांब उभे राहिले तरी आवाज येतो म्हणून शक्यतो बुमर पासून मुलाखत देणाऱ्यांनी लांब उभे राहावे. अनेक जन मुलाखत देताना मुलाखत देताना हाताने  बुमर स्वतः जवळ, तोंडा जवळ ओढत असतात. बाईट सुरु करण्या आधी असे न करण्याची व बुमर ला हात न लावण्याची, रिपोर्टर जवळ न येण्याची सूचना करावी.
 • मोठा बुमर हातात पकडून ठेवण्यापेक्षा एका छोट्या फोल्डेबल स्टँडवर तो ठेवावा.
 • बुमरचा माईक हा काही ठिकाणी सॅनीटाइज करून घेत असले तरी तो तोंडाच्या खूप जवळ असतो. काही जण आपला चेहरा नीट दिसावा म्हणून मास्क खाली करून मुलाखत देतात. अशांना बोलताना मास्क लावलेलाच ठेवावा अशी विनंती करावी. तसेच बुमर वर ही एक मास्क लावावा. मास्क किंवा प्लास्टिक कव्हर लावले तरी बुमर मध्ये आवाज पकडला जातो.
 • मुंबई वगळता इतरत्र कॅमरामन व रिपोर्टर हे सहसा एकाच दुचाकीवर फिरतात. त्यांनी वेगळ्या दुचाकी वापराव्या.
 • ओबी व्हॅन मध्ये हात धुण्यासाठी नळ असलेला पाण्याचा ड्रम व लिक्विड सोप ठेवावा. वार्तांकन झाल्यावर गाडीत बसताना किंवा वार्तांकना दरम्यान वारंवार साबणाने हात धुवावे. सॅनीटायजर वापरणे, ग्लोव्हज घालणे पुरेसे नाही. हात धुण्याला पर्याय नाही.
 • फिल्ड वरील सर्व प्रतिनिधींनी विटामिन डी चे डोस घ्यावे , आपले हिमोग्लोबिन नॉर्मल आहे की नाही याची चाचपणी करून घ्यावी.
 • रोज सोबत असलेले सामान ऑफिस मध्ये न नेता सोबत घेऊन जावे पण घरी नेऊ नये. शक्यतो ओबी व्हॅन मध्येच राहू द्यावे. दर दोन दिवसांनी सोडियम हायपोक्लोराईटने ते पुसून घ्यावे. ओबी रोज किंवा अधून मधून सोडियम हायपोक्लोराईटने धुऊन घ्यावी.
 • शक्यतो फिल्ड वरील टीमने ऑफिस मध्ये येऊ नये.
 • प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिकच्या सर्व प्रतिनिधींनी वार्तांकनासाठी हॉस्पिटल आवारात जाणे टाळावे. गेलेच तर कोरोना कक्षात मुळीच जाऊ नये.
 • मुलाखती सध्या जशा सुरु आहेत तशा स्काईप च्या माध्यमातून घ्याव्या व पाहुण्यांना स्टुडीओत बोलावणे टाळावे.
 • सतत वार्तांकन करत असताना व बातम्या देत असताना त्याचा ही ताण मनावर येणे साहजिक आहे. अशा वेळी समुपदेशकांचा सल्ला घ्यावा.
 • वार्तांकन करत असताना हॉट स्पॉट मध्ये मास्क सह फेस शिल्ड व कन्टेनमेंट झोन मध्ये बेसिक पीपीई कीट वापरावी.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता