सौम्य, मध्यम व तीव्र कोरोना कोरोनाचा संसर्ग झाल्यावर बहुतांश जणांमध्ये तो सौम्य / मध्यम स्वरूपाचा असेल म्हंटले जाते. सौम्य, मध्यम व तीव्र कोरोना पण आपल्याला झालेला कोरोना हा नेमका सौम्य / मध्यम स्वरूपाचा आहे आणि ही पातळी ओलांडल्यावर त्याला कधी सिरीयस मानायचे हे सर्वांना माहित असायला हवे.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
सौम्य | मध्यम | तीव्र ( सिरीयस ) | |
ऑक्सिजनची पातळी | ९४ पेक्षा जास्त | ९० ते ९४ | ९० पेक्षा कमी |
श्वासाची गती | २४ पेक्षा कमी | २४ ते ३० | ३० पेक्षा जास्त |
निमोनिया | नाही | असतो | जास्त असतो |
सि.टी. स्कॅन | नॉर्मल / २५ टक्के पेक्षा कमी | २५ – ७५ टक्के | ७५ – १०० टक्के |
ऑक्सिजनची गरज | नाही | लागू शकते – ऑक्सिजन टार्गेट ९२-९६ टक्के | लागते ऑक्सिजन टार्गेट ९० टक्के पेक्षा जास्त |
ब्लड प्रेशर हृदयाचे ठोके मोजण्याची गरज | दररोज एकदा | दररोज दर ६ तासांनी | दररोज दर ४ तासांनी |
श्वासाची गती आणि ऑक्सिजन | दररोज दर ६ तासांनी | दररोज दर २ तासांनी | सतत |
सुट्टी कधी | लक्षणांपासून १० दिवसांनी + ३ दिवस ताप नसावा व श्वास घेण्यास त्रास नसावा. | लक्षणांपासून १० दिवसांनी + ३ दिवस ताप नसावा व श्वास घेण्यास त्रास नसावा. | पूर्ण बरे झाल्यावर |
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.