मुलांना कोरोना झाला तर काय?

मुलांना कोरोना झाला तर

सध्या कोरोनाची जागतिक साथ सुरु असताना सर्व पालकांच्या मनात आपल्या मुलांना कोरोना झाला तर काय? तो मुलांमध्ये टाळायचा कसा? आणि मुलांना कोरोना झाला तर काय हे प्रश्न मनात येणे साहजिक आहे. कोरोनाच्या बाबतीत एक दिलासादायक गोष्ट अशी आहे की लहान मुलांना याचा धोखा कमी आहे. लहान मुलांना कोरोनाग्रस्त रुग्णाशी संपर्क आल्यास संसर्ग होऊ शकतो. पण लहान मुलांमध्ये याची लक्षणे ही सौम्य स्वरुपाची आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

ताप, कोरडा खोकला, काही प्रमाणात सर्दी एवढीच फ्लू सारखी लक्षणे कोरोना व्हायरस COVID-19 मध्येही लहान मुलांमध्ये दिसू शकतात. याची तीव्रता मोठ्या व्यक्तीं एवढी नाही. अगदी तुरळक स्वरूपाचा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसेच सर्व वयोगटा मध्ये लहान मुलांमध्ये हा मृत्युदर कमी म्हणजे ०.२ टक्के इतकाच आहे. तो ही कुपोषित, ह्र्दय रोग, जन्मजात फुफुसाचा आजार अशा लहान मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरस टाळण्यासाठी काय करता येईल? जर घरात किव्हा आजूबाजूला कोरोना व्हायरस चा रुग्ण असेल तर मुलांना कोरोना व्हायरस च्या रूग्णापासून लांब ठेवावे. ३१ मार्च पर्यंत सर्व शाळा बंद असे पर्यंत शाळेत पाठवू नये. त्यानंतर शाळा सुरु झाल्यावर मुलाला खोकला व ताप असल्यास आठवडा भर शाळेत पाठवू नये. कोरोना टाळण्याचा सर्वोत्तम उपाय हा हात धुणे आहे. त्यासाठी साबण व पाण्याचा वापर करावा. लहान मुलांसाठी अल्कोहोल युक्त हँन्ड सॅनीटायझर वापरू नये. मुलांना हात धुण्याची योग्य पद्धत शिकवावी.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता