COVID-19 मोबाईल फोनची स्वच्छता

COVID-19 मोबाईल फोनची स्वच्छता कोरोना व्हायरस पासून सुरक्षित राहण्यासाठी मोबाईल फोनची योग्य पद्धतीने स्वच्छता करणे खूप गरजेचे आहे. मोबाईल फोनची स्वछता पुढीलप्रमाणे करावी.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख

1. कोरोना पसरवण्यासाठी आपला मोबाईल कारणीभूत ठरू शकतो. 2. शक्यतो बाहेर जाताना मोबाईल सोबत घेऊन जाऊ नये. 3. शक्यतो आपला मोबाईल आपणच वापरावा. 4. घरी कोणी बाहेरून इतर व्यक्ती आली असल्यास त्यांना मोबाईल देऊ नये. 5. COVID-19 मोबाईल फोनची स्वच्छता करताना शक्यतो मोबाईल कव्हर किंवा केस सध्या वापरू नका कारण त्याने विषाणू जमा होण्यासाठी सरफेस वाढतो. 6. बाजारात मोबाईल अथवा इलेक्ट्रॉनिक गॅझेट स्वच्छ करण्यासाठी अनेक प्रकारचे अँटिबॅक्टेरिअल लिक्विड मिळतात पण या साठी साधा घरगुती हँड सॅनीटायझर किंवा सर्जिकल स्पिरीट वापरण्यास ही हरकत नाही.

7. अँटिबॅक्टेरिअल मायक्रो फायबर कापडावर हे हँड सॅनीटायझर / स्पिरीट घ्या. 8. मोबाईल स्वच्छ करण्यासाठी अँटिबॅक्टेरिअल लिक्विड वापरत असल्यास स्प्रे बॉटलमधूनदेखील या लिक्विडचा वापर तुम्ही करू शकता. मात्र ते थेट मोबाईलवर स्प्रे करण्याऐवजी कापडावर घ्या. 9. या कापडाने तुमचा मोबाईल फोन स्वच्छ पुसून घ्या. लिक्विडचे प्रमाण अधिक घेऊ नका ज्यामुळे तुमचा मोबाईल जास्त ओला होणार नाही. 10. फोन व्यवस्थित कोरडा होईपर्यंत तो पुसून घ्या. 11. दिवसातून दोनदा तुमचा फोन नीट स्वच्छ करून मगच त्याचा वापर करा. 12. मोबाईल स्वच्छ केल्यावर हात धुवायला विसरू नका. 13. या काळात शक्यतो मुलांना मोबाईल पासून लांब ठेवा.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

COVID-19 नोटा कश्या हाताळायच्या

COVID-19 नोटा कश्या हाताळायच्या

COVID-19 नोटा कश्या हाताळायच्या कोरोना नोटांमुळे पसरतो की नाही या विषयी विवाद असेल तरी जागतिक आरोग्य संघटनेने या विषयी इशारा दिला आहे. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या वस्तू वर काही तास राहते म्हणून नोटांमधून संसर्ग होऊ शकतो. यासाठी काही सोपे मार्ग आहेत. जिथे शक्य आहे तिथे सरळ कॅशलेस व्यवहार करायचा. हे शक्य नसेल आणी नोटा हाताळाव्याच लागल्या तर त्या दुसऱ्या कडून प्लास्टिक च्या एखाद्या छोट्या बॅग मध्ये हात न लावता स्वीकारायचे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

COVID-19 नोटा कश्या हाताळायच्या किराणा व्यापारी, भाजी विक्रेते ज्यांना रोज खूप नोटा हाताळाव्या लागतात त्यांनीस सरळ ग्लोज वापरावे. इतर कमी प्रमाणात रोज ची घरगुती कॅश हाताळणाऱ्यांसाठी एक पर्याय आहे. घरी आल्यावर ग्लोज घालावे, त्यावर असेल तर थोडा हँड सॅनीटायझर घ्यावा. आणि इस्त्री ने नोटांना दोन्ही बाजूने इस्त्री करून घ्यावी. कोरोना विषाणू ५६ डिग्री सेल्सियस च्या वर जिवंत राहत नाही आणि इस्त्रीचे तापमान त्या पेक्षा जास्त असते. नंतर या नोटा घरात कोणीही हाताळल्या तरी काही प्रोब्लेम नाही.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

हात धुण्याचे नियम

हात धुण्याचे नियम

हात धुण्याचे नियम सध्या हात धुणे हे कोरोना टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहे. वारंवार हात धुवावे म्हणजे नेमके किती वेळा धुवावे व कसे धुवावे हे समजून घेतले पाहिजे. हात धुण्यासाठी साबण आणि पाणी पुरेसे आहे. त्यासाठी हँड सॅनीटायझर किंवा अल्कोहोल बेस्ड सॅनीटायझरची मुळीच गरज नाही.

त्यातच लिक्विड सोप असल्यास बरे पण नसल्यास साधा साबण ही पुरे. याउलट असे काही विषाणू आहेत जे साबण आणि पाण्याने प्रभावी पणे हातावर निष्प्रभ होतात पण सॅनीटायझरने होत नाहीत. हात कसे धुवावे यासाठी आदर्श ७ स्टेप्स आहेत. त्या नेमक्या काय आहेत हे खाली क्युआर कोड स्कॅन करून व्हिडीओ मध्ये बघता येतील. या सगळ्या स्टेप्स पूर्ण करायला किमान १ मिनिट लागायला हवा. हात धुताना प्रत्येक वेळेला ते एकमेकांवर घासले जाणे महत्वाचे असते. शक्य असल्यास हात धुवून झाल्यावर नळ त्याच धुतलेल्या हाताने नव्हे तर कोपराने बंद करावा. हात धुतल्यावर तो स्वच्छ नॅपकीन ला पुसावा. घरात प्रत्येकाचा शक्यतो वेगळा छोटा नॅपकीन ठेवावा. रोज तो गरम पाण्यात ठेवून, पिळून वळवायला ठेवावा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

हात धुण्याचे नियम समजून घेणे महत्वाचे आहे हात बाहेर जाऊन आले तेव्हा, घरात एखादी नवीन व्यक्ती येऊन गेली असल्यास, जेवणा आधी व शौचानंतर धुवायचे आहेत. अगदी घरात असताना दर अर्ध्या एक तासाला हात धुण्याचीही गरज नाही. तसेच हात धुवून झाल्यावर जिथे शक्य आहे तिथे हाता ऐवजी कोपराचा वापर करावा, उदाहरणार्थ दरवाजा ढकलणे, लाईट चालू , बंद करणे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता