होम क्वारंटाइन म्हणजे काय

होम क्वारंटाइन म्हणजे नेमके काय

होम क्वारंटाइन म्हणजे नेमके काय? कोरोना व्हायरस च्या साथीमध्ये सध्या अनेकांना होम क्वारंटाइन सांगून ही ते दिलेल्या सूचनांचे पालन करत नाहीत. ज्यांना हा सल्ला दिला आहे त्यांनी होम क्वारंटाइन म्हणजे नेमके काय हे समजून घेण्यासाठी पुढील गोष्टी करायच्या आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

– शक्यतो वेगळी शौचालयाची सोय असलेल्या आणि वाऱ्याचे चांगले सर्क्युलेशन असलेल्या रूममध्ये राहणे व कुटुंबातील इतर सदस्यांना न भेटणे. – इतर सदस्यांना त्याच खोलीत राहणे आवश्यक असल्यास त्यांच्या पासून १ मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवणे व त्यांना स्पर्श न करणे. – होम क्वारंटाइन मध्ये असेलेल्या व्यक्तीचे जेवणाचे भांडे, कपडे वेगळे ठेवणे व वेगळे धुणे. – ६० वर्षा पेक्षा जास्त वय, कुठल्याही वयाची मधुमेह, डायबेटीस चे रुग्ण, लहान मुले, गरोदर माता यांच्याशी या व्यक्तीचा थेट संपर्क यायला नकोच. – घराचा उंबरठा हा १४ दिवस ओलांडायचा नाही. – कुठे ही हात लागल्यास लिक्विड सोप / साबण व पाण्याने हात धुवावे. – पूर्णवेळ मास्क वापरावा व तो दर ६ तासाने बदलावा. जुना मास्क ५ % ब्लिचिंग सोल्युशन मध्ये टाकून नंतर जाळावा किंवा जमिनीखाली पुरावा. मास्क जळताना काळजी घ्यावी. – ताप, खोकला अशी कुठलीही लक्षणे दिसल्यास सरकारी यंत्रणेशी संपर्क करावा. – होम क्वारंटाइन मध्ये असलेल्या व्यक्तीला जेवण देणे किंवा इतर गोष्टी देण्याची जबाबदारी एकाच व्यक्तीने पार पाडावी. – या व्यक्तीला जेवण किंवा इतर गोष्टी देणाऱ्या व्यक्तीने मास्क, ग्लोज घालावे. – या घरात शक्यतो एकाही बाहेरच्या व्यक्तीला येऊ देऊ नये.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता