कोरोना टाळण्यासाठी टी झोन मध्ये हात लावणे टाळा

टी झोन मध्ये हात लावणे टाळा

कोरोना टाळण्यासाठी टी झोन मध्ये हात लावणे टाळा कोरोना टाळण्यासाठी हात धुणे जितके महत्वाचे आहे तितकेच गरज नसताना चेहऱ्याला हात न लावणे महत्वाचे आहे. चेहऱ्याला, केसांना हात लावणे ही आपल्याला अजाणतेपणाने लागली सवय आहे. वागणुकीचे शास्त्र असे सांगते कि ज्या प्राण्यांपासून आपली उत्क्रांती झाली तेव्हा पासून ही सवय मानवाला चीटकलेली आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना टाळण्यासाठी टी झोन मध्ये हात लावणे टाळा चेहऱ्याला हात लावणे, केसांमधून हात फिरवणे हे तणावापासून मुक्ती देणारी कृती असते. अनेकांना नखे खाणे किंवा वारंवार नाकाच्या शेंड्याला हात लावणे अशा सवयी ही लागलेल्या असतात. मुलींना केस वारंवार निट करण्याची सवय लागलेली असते. सरासरी प्रत्येक जन एका तासात १५ ते २४ वेळा चेहऱ्याला हात लावतो. पण कोरोना टाळण्यासाठी ही सवय आपल्याला मोडावी लागणार आहे. याचे कारण हात धुतले तरी हात धुतल्यावर आपला हात कोरोना बाधित जागेला लागला व तोच हात आपण चेहऱ्या वरून फिरवला तर आपल्याला कोरोनाची बाधा होऊ शकते. चेहऱ्याच्या ज्या भागांना हात लावायचा नाही त्याला टी झोन असे म्हणतात. यात दोन्ही डोळे, नाक आणि तोंड येते. हे टी झोन महत्वाचे असले तरी पूर्ण चेहऱ्यालाच हात लावणे टाळावे. तसेच केसांना ही उगीच हात लावणे टाळावे. घरात प्रत्येकाचा कंगवा ही वेगळा असावा. ही सवय मोडण्यासाठी आम्ही  डॉक्टरांनी एक शक्कल लढवली आहे.  हाताच्या कोपराला घट्ट चीगटपट्टी रोमन लेटर II म्हणजे  लिहितात तशा घट्ट चीगट पट्ट्या उभ्या आणि दोन आडव्या लावायच्या. यामुळे ठरवल तरी हात चेहऱ्या पर्यंत जाऊ शकत नाही. डॉक्टरच नाही तर पोलीस व फिल्ड वर वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनी हे करायला हव. वारंवार चेहऱ्याला हात लावणे टाळण्यासाठी आता काही अॅप्स ही आले आहेत. तुमचा हात चेहऱ्याला जवळ गेला कि हे अॅप्स तुम्हाला एक विशिष्ट आवाजाने सिग्नल देतात.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता