कोरोनाची ‘नवीन’ लक्षणे उघड

कोरोनाची 'नवीन' लक्षणे उघड

कोरोनाची ‘नवीन’ लक्षणे उघड ज्या कोरोना व्हायरसमुळे संपुर्ण जग हादरले आहे त्या व्हायरस ची आता नवीन नवीन लक्षणे दिसू लागली आहेत. आतापर्यंत कोरोनाची सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास ही प्रमुख लक्षणे सांगितली जात होती. मात्र आता त्यात बोलण्यास अडथळा येणे आणि चालता न येणे या नवीन लक्षणांची भर पडली आहे

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या नव्या माहितीनुसार, आता कोरोनाची काही नवीन लक्षणं समोर आली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेतील तज्ज्ञांच्या मते कोरोना संक्रमित व्यक्तींना बोलताना बराच त्रास होतो. धक्कादायक म्हणजे अनेकदा हे लक्षणं अगदी शेवटी समोर येतात. कोरोना रुग्णाला बोलायला, चव ओळखायला, चालायला देखील त्रास होणे, असं संशोधन समोर आलं आहे.

लक्षणं न दिसण्याच्या आणि तात्काळ निदान न होण्याच्या कोरोनाच्या गुणधर्मामुळे याचा सर्वात वेगानं प्रसार होतोय. त्यातच आता कोरोनाची नवीन लक्षणं समोर आली आहेत. म्हणूनच कोरोनासंबंधी कोणतंही लक्षण दुर्लक्षित करुन चालणार नाही. शिवाय, सतत क्वारंटाईन आणि आयसोलेशन मध्ये ठेवल्यामुळे आणि संसर्ग झाल्याच्या भीतीने मानसिक आजार उद्भवू शकतात.

कोरोना तपासणीसाठी नवे निकष

भारतात आतापर्यंत जवळपास 94 हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधीत झाले आहेत. तर, जगभरात 3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामूळे, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या नव्या लक्षणांबाबत नवा इशाराही दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने छातीत दुखणे, बोलण्यास अडथळा, चालण्यास अडथळा ही नवी लक्षणे समोर आणली आहेत. त्यामूळे, किमान भारतात तरी कोरोना चाचणीचे निष्कर्ष बदलले पाहिजे अशी मागणी वैद्यकीय तद्य करत आहेत.

काय आहेत कोरोनाची संभाव्य लक्षणे ?

वैद्यकीय तज्ञ. अमोल अन्नदाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ही सध्या कोरोनाची राजधानी बनली आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्ण हे राज्यात आहेत. सध्या राज्यात कोरोनाबाबतच्या चाचणीचे निष्कर्ष चुकीचे आहेत. फक्त लक्षणे असणार्यांच्याच चाचण्या केल्या जात आहेत. त्यामूळे, सुपर स्प्रेडर जे आहेत त्या या चाचणीतून निसटत आहेत.?

कोरोनाची ‘नवीन’ लक्षणे उघड अशक्तपणा, उलट्या, अनियंत्रित जुलाब, वास घेण्याची क्षमता कमी होते, चव लागत नाही, झपाट्याने तब्येत खालावते, निस्तेज वाटणे, झोपेत राहणे, मेंदूशी निगडित आजार ही संभवणे, सर्वात जास्त खोकला असणे, चालायला त्रास होणे, बोलायला त्रास होणे, ऑक्सीजन पातळी कमी होणे ही सर्व संभाव्य लक्षणे असू शकतात असे ही डॉ. अमोल अन्नदाते यांनी स्पष्ट केले आहे.

हा व्हायरस आरएनए प्रकारचा आहे. आणि कोणताही व्हायरस हा बहुरुपी असतो. तो त्याची लक्षणे बदलू शकतो. त्यामूळे कोरोना वरील तयार केल्या जाणार्या लसी किती कारणीभूत ठरू शकतील यावर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राज्यात 30 टक्के लोक करतात लॉकडाऊनचा फज्जा- राज्यात 30 टक्के लोक हे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन पाळत नाहीत. शिवाय, राज्यातील होम क्वारंटाईन ही संकल्पना अयशस्वी ठरली आहे. धारावी सारख्या झोपडपट्टीतील घरात 6 ते 7 जण राहतात. इथे सोशल डीस्टस्टींग पाळणे शक्यच नाही हे देखील डॉ. अन्नदाते यांनी स्पष्ट केले आहे.

सदरील माहिती आपण ई सकाळ मध्येही वाचू शकता