कारमध्ये हँन्ड सॅनिटायझर वापरणे सुरक्षित!

कारमध्ये हँन्ड सॅनिटायझर वापरणे सुरक्षित!

कारमध्ये हँन्ड सॅनिटायझर वापरणे सुरक्षित मध्यंतरी कार मध्ये हँड सॅनिटायझर  मुळे स्फोट झाल्याच्या बातम्या समाज माध्यमांवर प्रसारित झाल्या होत्या. यामुळे कार मध्ये हँड सॅनीटायजरच्या  वापरा संबंधी भीती पसरली. पण यात काही तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले आहे. हँड सॅनिटायझर  मध्ये अल्कोहोलच्या रूपाने ज्वलनशील पदार्थ असला तरी त्यामुळे कार पेट घेईल असा स्फोट होऊ शकत नाही. सध्या बाजारत उपलब्ध असलेले प्रमाणित हँड सॅनिटायझर  आपण वापरात असाल तर असा कुठला ही धोका नाही. हँड सॅनिटायझर  अग्नी जवळ किचन जवळ नेऊ नये हे खरे आहे. जर अग्नीचा स्पार्क हँड सॅनीटायजरच्या उघड्या बाटलीच्या संपर्कात आली तर पेट घेऊ शकते व हे ज्वलनशील असते पण हातावर सॅनिटायझर  घेऊन तुम्ही किचन मध्ये गेला तर तुमचे हात पेट घेतील हा ही गैर समज आहे. गाडीत हँड सॅनीटायजरने पेट घेण्यासाठी गाडीतील तापमान ६०० डिग्री फॅरनहाइट किंवा ३१५ डिग्री सेल्सियस इतके जास्त असायला हवे जे कधी ही शक्य नाही. गाडी मधील एअर फ्रेशनर, परफ्युम मध्ये ही अल्कोहोल असते . फक्त हँड सॅनिटायझर  गाडीत वापरताना काही काळजी जरूर घ्यावी  –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • हँड  सॅनिटायझर  आडवे ठेवू नये, उभे ठेवावे.
  • हँड  सॅनिटायझर  चा वापर झाल्यावर ते नीट बंद करावे.
  • हँड सॅनिटायझर  समोर बोनेट जवळ किंवा मागे डिक्की मध्ये गरम जागी ठेवू नका. शक्यतो सीटच्या मागे किंवा मागच्या सीट जर जिथे गाडी जास्त गरम होत नाही अशा ठिकाणी ठेवा.
  • शक्यतो गाडी मध्ये हँड सॅनीटायजरच्या १०० ते २०० एमएल च्या छोट्या बाटल्या ठेवा.

कारमध्ये हँन्ड सॅनिटायझर वापरणे सुरक्षित गाडी मध्ये हात धुणे शक्य नसल्याने व अवघड असल्याने गाडीत कामासाठी जाताना, उतरताना , काम झाल्यावर गाडीत बसताना हँड सॅनीटायजरचा वापर करावाच लागेल. म्हणून अशी गाडी पेट घेण्याची कुठलीही भीती न बाळगता गाडीत  हँड सॅनीटायजरचा वापर करा.   

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

फळे भाज्यांसाठी सॅनिटायजर साबण वापरू नका!

फळे, भाज्यांसाठी सॅनिटायजर, साबण वापरू नका!

फळे भाज्यांसाठी सॅनिटायजर साबण वापरू नका! अनेक ठिकाणी फळे व भाज्या सॅनिटायजरने फवारणी करून किंवा साबणाने धुवून वापरली जात आहेत. हे करणे गरजेचे नाही व यामुळे शरीराला, आतड्यांना हानी होऊ शकते; तसेच बाजारात खास फळे, भाज्यांसाठी वेगळे सॅनिटायजरही विक्रीसाठी आले आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

हे विकत घेऊ नये व वापरू नये; तसेच सॅनिटायजरचा वापर फक्त हात, धातू व स्टील यांवरचे व्हायरस नष्ट करण्यासाठीच होतो म्हणून इतर कुठेही हे वापरू नये.फळे व भाज्यांवर कोरोना व्हायरस ४ ते ६ तास राहू शकतो. त्यामुळे यासाठी करण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे फळे, भाज्या आणल्यावर आणलेल्या पिशवीतच ६ तास घरा बाहेर ठेवल्या जाऊ शकतात. त्यांनतर त्यांना कोमट पाण्यामध्ये बेकिंग सोडा किंवा पोटॅशियम परमँग्नेट टाकून त्या पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून नंतर वाहत्या पाण्याखाली धुवून वापरल्या जाऊ शकतात. फळे, भाज्यांसाठी सॅनिटायजर, साबण वापरू नका!त्यानंतर शक्य असल्यास हेअर ड्रायरची गरम हवा फळ-भाज्यांवरून फिरवली जाऊ शकते. हेअर ड्रायर उपलब्ध नसेल, तर ही स्टेप वगळली तरी चालेल. केळी किंवा कांद्यासारख्या गोष्टी पाण्यात टाकल्या जाऊ शकत नाहीत व पाण्यात टाकल्यास खराब होऊ शकतात. या वस्तू ६ तासाने घरात आणाव्या व केळी एक दिवसानी, कांदे तीन दिवसांनी वापरावे. तोपर्यंत घरात बंद डब्यात पडू द्यावे. फळे, भाज्या आणण्यासाठी पेपरच्या बॅग वापरणे योग्य ठरेल म्हणजे, त्या घराबाहेर जाळून टाकल्या जाऊ शकतात. पेपर बॅग वापरली जात नसेल, तर इतर बॅगा घराबाहेरच ठेवाव्या

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कुठले हँड सॅनिटायझर सर्वोत्तम

कुठले हँड सॅनिटायझर सर्वोत्तम

कुठले हँड सॅनिटायझर सर्वोत्तम सध्या अनेक कंपन्यांचे हँड सॅनीटायझर उपलब्ध आहेत. तसेच जाहिरातीतून ९९.९ % हातावरील विषाणू व जीवाणू नष्ट करत असल्याचे दावे हे केले जात आहेत. पण इतक्या अचूकतेने असे दावे करणे चुकीचे आहे व कुठले ही सॅनिटायझर ९९ % विषाणू, जीवाणू नष्ट करेल हे खात्रीशीर रित्या सांगता येणार नाही. यासाठी साबणाने हात धुणे याला पर्याय नाही व हँड सॅनिटायझर ही केवळ एक लग्झरीआहे. सांगण्याचे तात्पर्य साबणाने हात धुण्याची जागा हँड सॅनिटायझर र घेऊ शकत नाही. पण पाण्याची उपलब्धता व बाहेर गेल्यावर हात धुण्याची सोय नसल्यास हँड सॅनिटायझर चांगला पर्याय ठरतो. बाजारात उपलब्ध असलेल्या पैकी चांगला हँड सॅनिटायझर कुठला हे आपल्याला ओळखता आले पाहिजे .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

       कुठले हँड सॅनिटायझर सर्वोत्तम अल्कोहोल हा हँड सॅनिटायझरचा मुख्य घटक असतो. पण कुठले व किती टक्के अल्कोहोल वापरेल आहे त्यावरून हँड सॅनिटायझरची उपयुक्तता सिध्द होते. साधारण तीन ते चार प्रकारचे व टक्केवारी मध्ये अल्कोहोल वापरेल जाते. प्रोपेनेलॉल, डी नेचर्ड अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, आयसो प्रोपील अल्कोहोल हे ते चार प्रकारचे अल्कोहोल असतात. त्यांची परीणामकारकता वरील नावे लिहिली आहेत  क्रमाने जास्त ते कमी अशी असते. यात ७५ % प्रोपेनेलॉल असलेले सर्वाधिक परिणामकारक असते. हे कोरोना साठीच नव्हे तर इतर सर्व विषाणू – जीवाणूला हा क्रम लागू पडतो. ज्या हँड सॅनिटायझर मध्ये प्रोपेनेलॉल सोबत मेसेट्रोनियम इथिल सल्फेट असते त्याची परिणाम कारकता सर्वाधिक वेळ म्हणजे ३ ते ५ तास टिकून राहते. सर्वात परिणामकारक हँड सॅनिटायझर वापरला तरी त्याचा परिणाम ४ ते ६ तासच राहतो. सध्या उपलब्ध असलेल्या जेल आणि पातळ हँड सॅनिटायझर पैकी पातळ हँड सॅनिटायझर जास्त परिणामकारक असतो कारण तो हातांच्या सूक्ष्म भेगां पर्यंत पोहोचू शकतो. जेलच्या स्वरूपातला मात्र त्वचेच्या खोलवर पोहोचू शकत नाही व वरच्या भागावरच थर बनून राहतो. अनेकांना जास्त हँड सॅनिटायझरच्या वापरामुळे जास्त झोप येणे / गुंगल्या सारखे वाटणे हा त्रास होतो आहे. त्यातच डॉक्टरांना सध्या हँड सॅनिटायझर जास्त प्रमाणात वापरावे लागते. त्यासाठी हातावर हँड सॅनिटायझरचा घेताना एका बाजूला म्हणजे सॅनिटायझर समोर चेहरा येणार नाही असे बघाव.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता