हात धुण्यामुळे त्रास होत असल्यास

हात धुण्यामुळे त्रास होत असल्यास

हात धुण्यामुळे त्रास होत असल्यास सध्या वारंवार हात धुणे व हँड सॅनीटायजर चा वापर करणे कोरोना टाळण्यासाठी आवश्यक आहे. पण वारंवार हात धुण्याने अनेकांच्या हाताला कोरडेपणा ( ड्रायनेस ) येऊ लागला आहे. याचे एक कारण असे ही आहे कि या पूर्वी आपल्याला हात धुण्याची सवय नव्हती. यासाठी हात धुतल्या नंतर लगेचच मुलायम कपड्याने पाणी पुसून घ्या व त्यानंतर लगेचच कुठले ही मॉईस्चरायजर लगेचच हाताला लावावे. ते ही नसेल तर डोक्याला लावायचे खोबऱ्याचे थोडे तेल हाताला लावले तरी चालेल. रात्री झोपताना तिळाचे तेल हाताला लावून झोपावे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

हात धुण्यामुळे त्रास होत असल्यास हँड सॅनीटायजर मध्ये अल्कोहोल असते व अनेकांना त्याची अॅलर्जी असते. काहींना त्यामुळे हात चुरचुरण्याचा त्रास होतो. असे होत असल्यास आणि नियमित हात धूत असल्यास हँड सॅनीटायजर वापरला नाही तरी चालेल. कोरोना साठी मुख्य प्रतिबंधक उपाय हा साबणाने हात धुणे हा आहे व हँड सॅनीटायजरचा वापर हा एक आधार आहे. जिथे बाहेर गेल्यावर हात धुण्याची सोय नाही तिथेच त्रास होत असणाऱ्यानी हँड सॅनीटायजरचा वापर करावा.

हात धुण्यामुळे त्रास होत असल्यास हात धुण्याविषयी एक मानसिक समस्या वाढल्याचे ही मानसोपचार तज्ञांचे निरीक्षण आहे. एखादी गोष्ट इच्छा नसताना वारंवार करण्याची नियंत्रित न करता येणारी  भावना मनात येण्याची एक मानसिक समस्या असते. यात सर्वाधिक प्रमाण हे हात धुण्याची आणि स्वच्छतेची सवय असते. सध्या भीती पोटी गरजे पेक्षा जास्त वेळा हात धुण्याची इच्छा होण्याची मानसिक समस्या काहींना भेडसावते आहे. कोरोना टाळण्यासाठी हात धुणे आणि वारंवार उगीचच हात धुणे यात फरक आहे. हा फरक स्वतःला व कुटुंबातील इतरांना ही लगेच लक्षात येईल. असे होत असल्यास मानसोपचातज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता