इन्फ्रारेड थर्मामीटर कसे वापरावे ?

इन्फ्रारेड थर्मामीटर कसे वापरावे?

इन्फ्रारेड थर्मामीटर कसे वापरावे? सध्या अनेक ऑफिस, घरांमध्ये इन्फ्रारेड थर्मामीटर वापरले जाते आहे. अनेक ऑफिस मध्ये केवळ सोपस्कार म्हणून लांबून हे थर्मामीटर शरीरावर कुठे ही मारले जाते. त्यामुळे या थरमॉमीटरचा योग्य वापर करण्यास शिकले पाहिजे. तसेच इतर पद्धतीने ताप कसा मोजायचा हे ही कळले पाहिजे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

    इन्फ्रारेड थर्मामीटर कसे वापरावे ? इन्फ्रारेड थर्मामीटर वापरण्याचा एक फायदा असा आहे की यामुळे ताप असलेल्या व्यक्तीचा आणि थर्मामीटरचा संपर्क येत नाही. पण याचा तोटा हा आहे कि सार्वजनिक ठिकाणी याचा वापर करताना सोशल डीस्टन्सिंगचा फज्जा उडतो. अर्थात याला ही उपाय आहे. हे थर्मामीटर कसे वापरावे हे जाणून घेऊ –

 • इन्फ्रारेड थर्मामीटर कसे वापरावे ? आधी थर्मामीटर खाली अंगठा ठेवण्यासाठीचे बटन हलक्याने दाबून सुरु करावे. हे थर्मामीटर जोरात दाबून सुरु करण्याची गरज नाही व अगदी हलक्याने हाताळायचे असते.
 • आधी फॅरनहाईट की सेल्सियस याचे सेटिंग निश्चित करून घ्यावे
 • शक्यतो फॅरनहाईटचीच सेटिंग वापरावी. आपल्या देशातील डॉक्टर फॅरनहाईट मध्ये शरीराच्या तापमानाला सरावलेले आहेत. यामुळे तुमच्या डॉक्टरला तापमान लगेच कळेल.
 • तापमान घेतना इन्फ्रारेड थर्मामीटर हे कपाळाच्या मध्यभागी किमान ३ ते कमाल १५ सेंटीमीटर लांब पकडावे . कपाळ सोडून शरीराच्या इतर भागावर या थर्मामीटरने तापमान मोजू नये
 • तापमान घेताना अगदी बाहेर उन्हात किंवा उन्हातून आल्या आल्या किंवा ऑफिस मध्ये एसी / सेन्ट्रल एसी चालू असताना घेऊ नये. तापमान हा नॉर्मल रूमच्या तापमानाला घ्यावे .
 • तापमान घेताना कपाळावर घाम किंवा नुकतीच अंघोळ केली असल्यास किंवा चेहरा धुतला असल्यास तो पुसून वाळू द्या व त्यानंतर १० मिनिटांनी तापमान घ्या.
 • हे थर्मामीटर बऱ्यापैकी नेमकेपणाने तापमान मोजू शकत असले तरी खऱ्या तापमानात ०.१ डिग्रीचा फरक असू शकतात असे थर्मामीटर बनवणाऱ्या कंपन्या सांगतात. वास्तवात हा फेरफार १ डिग्री पर्यंत ही होऊ शकतो. तरी ही घरी सुरुवातीच्या तापमान चाचणी साठी हे थर्मामीटर वापरण्यास हरकत नाही.
 • तापमान जास्त आल्यास परत एकदा तापमान तपासावे.
 • तापमान १०२ च्या पुढे दाखवत असल्यास घरातील इतर नॉर्मल व्यक्तींचे तपासून पाहावे. ते नॉर्मल आल्यास हा मशीनचा बिघाड नसून दाखवलेले तापमान योग आहे असे समजावे.
 • इन्फ्रारेड थर्मामीटर कसे वापरावे ? सार्वजनिक ठिकाणी / ऑफिस मध्ये तापमान घेतना सोशल डीस्टन्सिंग पाळले जाण्यासाठी एकमेकांच्या समोर उभे राहणे पेक्षा एका रांगेत एकमेकांच्या बाजूला विरुद्ध दिशेने तोंड करून उभे राहावे. याने तापमान ही योग्य मोजता येईल व समोरासमोर संपर्क ही येणार नाही. जास्त लोकांची रोज तपासणी करावी लागत असल्यास फक्त हातच बाहेर येईल असे चेंबर तयार करता येतील.
 • तापमान मोजताना थ थर्मामीटरचा बाजूला करताना प्रकाशाचा झोत  डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी कारण इन्फ्रारेड प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.
 • घरामध्ये हे थर्मामीटर उंचीवर किंवा कपाटात ठेवावे म्हणजे ते लहान मुलांच्या हाती लागणार नाही असे ठेवावे कारण लहान मुले यासोबत खेळतात थर्मामीटर चालू करून इन्फ्रारेड  प्रकाश एकमेकांच्या डोळ्यात / स्वतः च्या डोळ्यात टाकू शकतात. त्यामुळे मुलांच्या डोळ्याला इजा होऊ शकते.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता