फेस शिल्ड वापरणे गरजेचे आहे का?

फेस शिल्ड वापरणे गरजेचे आहे का?

फेस शिल्ड वापरणे गरजेचे आहे का? सध्या अनेक जण फेस शिल्ड वापरावा कि नाही या संभ्रमात आहे. मास्कने नाक व तोंड झाकले तरी डोळ्यातून काही प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. अर्थात हा कोरोना बाधित व्यक्ती ६ फुटापेक्षा कमी अंतरात असेल व शिंकलाच व खोकलला तरच होईल. पण यासाठी ज्यांना चष्मा आहे , त्यांना फेस शिल्डची गरज नाही. जे चष्मा वापरत नाहीत त्यांनी गर्दीच्या ठिकाणी नंबर नसलेला साधा चष्मा / गॉगल वापरला तरी चालेल. म्हणून सर्वांनी फेस शिल्ड वापरावाच असे काही नाही. प्रतिबंधाच्या गोष्टी जितक्या साध्या, सोप्या आणि कमी ठेवल्या जातील तितक्या त्या अवलंबिल्या जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणून उगीचच फेस शिल्डची त्यात भर घालण्याची गरज नाही.
पण काही जन असे आहेत ज्यांना फेस शिल्ड वापरणे गरजेचे आहे व फेस शिल्ड मुळे प्रतिबंधात भर पडू शकेल.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • डॉक्टर , पॅरामेडिकल स्टाफ , स्वच्छता कर्मचारी
  • बँक , पोस्ट ऑफिस , विमानतळ , दुकान जिथे लोक काउन्टर वर समोर येऊन बोलतात.
  • पोलीस
  • कमी जागेत जास्त लोकांशी संपर्क येतो व सोशल डीस्टन्सिंग पाळणे अवघड आहे अशी ठिकाणे – उदाहरणार्थ हवाई सुंदरी, विमानातील प्रवासी , धार्मिक स्थळे
  • तळागाळात अनेक जणांमध्ये जाऊन काम करणारे सामाजिक कार्यकर्ते
  • फिल्ड वरून वार्तांकन करणारे पत्रकार
  • निवासी बिल्डींग , कार्यलया बाहेर दारावर उभे असणारे सुरक्षा कर्मचारी ( सिक्युरिटी गार्ड ) .

फेस शिल्ड वापरणे गरजेचे आहे का? फक्त वरील काही मोजक्या व्यक्ती सोडून इतरांनी फेस शिल्ड वापरण्याची गरज नाही. वरील जे व्यक्ती फेस शिल्ड वापरतील त्यांनी दर ४ ते सहा तासांनी तो आतून व बाहेरून नीट सॅनीटायजर स्प्रे मधून फेस शिल्डच्या दोन्ही बाजूच्या काचांवर शिंपडून तो स्वच्छ निर्जंतुक कापसाने किंवा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावा. घरात फेस शिल्ड ठेवू तेव्हा तो लहान मुलांच्या हाती लागणार नाही याची दक्षता घ्यावी .

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता