उगीचच मल्टी व्हिटामीनच्या गोळ्या घेऊ नका

उगीचच मल्टी व्हिटामीनच्या गोळ्या घेऊ नका

उगीचच मल्टी व्हिटामीनच्या गोळ्या घेऊ नका सध्या कोरोनाच्या भीती पोटी अनेक जन रोज मल्टी व्हिटामीनच्या गोळ्या घेत आहेत. औषध दुकानांवर या गोळ्यांचा खप प्रचंड वाढला आहे. व्हिटामीन  डी व शाकाहारी लोकांना व्हिटामीन   बी १२ , फोलिक अॅसिड सोडले तर इतर सर्व व्हिटामीन   हे मुबलक प्रमाणात फळे , भाज्या, खाद्य पदार्थांमध्ये असतात. त्यामुळे तुम्ही स्वस्थ असाल व तुमचा आहार चांगला असेल तर तुम्हाला मल्टीव्हिटामीनच्या गोळ्यांची गरज नाही. सध्या अशा मल्टी व्हिटामीन   गोळ्या जाहिराती ही वाढल्या आहेत. एक मोठा हिंदी चित्रपट स्टार जिंसिंग सह मल्टीव्हिटामीन च्या महागड्या  गोळीची जाहिरात करतो जी वारंवार दाखवली जाते आहे. काही जाहिरीतींमध्ये आता कोरोनाचे संदर्भ दिले जात आहेत. अशा जाहिरातींना कोणीही भुलू नये.बरेच जन व्हिटामीन   सीच्या गोळ्यांचे ही सेवन करत आहेत. तुम्ही रोज अर्धे  लिंबू पाण्यात पिळून घेतले तरी तुम्हाला पुरेसे व्हिटामीन सी मिळते. तसेच चांगला आहार असणार्यांच्या शरीरात व्हिटामीन सी चा साठा चांगला असतो म्हणून रोजच लिंबू पाण्यात घ्यायला हवे असाही काही नियम नाही. आपण आपल्या नियमित आहारात अधू मधून लिंबू पिळून घेतोच. तेवढे ही पुरेसे ठरेल. तसेच प्रोटीन सप्लीमेंट्स घेण्याची ही गरज नाही.

मल्टीविटामिन गोळ्या सल्ल्याशिवाय घेतल्याने विटामिन ए सारख्या काही विटामिन्सचा ओवर डोस ही होऊ शकतो. त्यामुळे इतर वेळीही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वितामिनच्या गोळ्या घ्याव्या. या शिवाय स्पिरुलीना , प्रतिकारशक्ती वाढवणारे हर्बल औषधे या ही कोरोना टाळण्यासाठी घेण्याची गरज नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

        उगीचच मल्टी व्हिटामीनच्या गोळ्या घेऊ नका व्हिटामीन डी मात्र सगळ्यांना घेण्याची गरज असते. हे  सोडून दुसरी घेण्याची गरज पडू शकते अशी गोष्ट म्हणजे लोह म्हणजे आयर्न. डॉक्टरांच्या परवानगीने फक्त पुढील काही जणांना काही सप्लीमेंट्सची गरज पडू शकते.  –

  • लहान मुले –आयर्न , कॅल्शियम
  • गरोदर माता – फोलिक अॅसिड , आयर्न , कॅल्शियम
  • गुटका , तंबाखू खाणारे – फोलिक अॅसिड
  • शाकाहारी – व्हिटामीन   बी १२
  • मद्यपान करणारे – फोलिक अॅसिड, व्हिटामीन   बी ६, ए , थायमिन
  • मधुमेह , किडनीचे आजार आणी कॅन्सर – यांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार

म्हणजेच आजार असले तरी सर्वच नव्हे तर प्रत्येक आजारा प्रमाणे नेमक्या स्प्लीमेंट्सची आवश्यकता असते. म्हणूनच नियमित आहार घेणार्यांनी कुठले ही स्प्लीमेंट्स घेण्याची गरज नाही. आजार असणार्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने नेमकी औषधे घ्यावी. 

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

विटॅमिन डी घेण्यास हरकत नाही

विटॅमिन डी घेण्यास हरकत नाही

विटॅमिन डी घेण्यास हरकत नाही विटॅमिन डी म्हणजेच ड जीवनसत्व हे प्रतिकारशक्ती साठी खूप महत्वाचे असते. विटॅमिन  डी घेतल्यावर कोरोना होणारच नाही असे म्हणता येणार नाही. पण मात्र कोरोनाचा संसर्ग झाला तर विटॅमिन  डी ची पातळी शरीरात नॉर्मल असल्यास कोरोनाशी लढण्यास त्या व्यक्तीचे शरीर अधिक सक्षम असेल. तसेच कोरोना मधील मृत्यू साठी कारण ठरत असलेली ‘एआरडीएस’ म्हणजे फुफ्फुससाला इजा होऊन ती निकामी होण्याचे प्रमाण ही विटॅमिन  डी शरीरात नॉर्मल असल्यास कमी प्रमाणात होऊ शकते. किंवा ते झाले तरी बरे होण्यास विटॅमिन  डी ची मदत होऊ शकते. याशिवाय सायटोकाईन या कुठल्याही जंतुसंसर्गात थोड्या प्रमाणात स्त्रवणाऱ्या एका घटकाचे  कोरोनाच्या गंभीर होणाऱ्या रुग्णांमध्ये मात्र  शरीरात वादळ येते.याला सायटोकाईन स्टॉर्म असेच म्हणतात. हे थोपवण्यात ही विटॅमिन  डी उपयोगी पडते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

    विटॅमिन डी घेण्यास हरकत नाही विटॅमिन  डी हे आपल्याला अन्नातून फारसे मिळत नाही. याचा महत्वाचा स्त्रोत असतो सूर्य प्रकाश. पण सूर्यप्रकाशातून विटॅमिन  डी पुरेशा प्रमाणात मिळवण्यासाठी रोज सकाळी १० ते दुपारी ४ च्या दरम्यान कधीही अर्धा तास कमीत कमी ( अर्ध्या बाहीचा पातळ शर्ट व अर्धी चड्डी ) कपडे घालून उन्हात थांबून आपल्या त्वचेचा जास्तीत संपर्क सूर्य प्रकाशाशी येऊ दला पाहिजे. पण आजच्या युगात हे कोणाला ही शक्य नाही. म्हणून देशातील ८० टक्के लोकांमध्ये विटॅमिन  डी ची कमतरता आहे. खर तर या कमतरतेमुळे हाडांच्या ही अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून कोरोनाच्या साथी आधी विटॅमिन  डी कमतरतेची दुर्लक्षित साथ अनेक दशकांपासून आपल्या देशात सुरु आहे. कोरोनाच्या निमित्ताने सगळ्यांनी विटॅमिन  डी घेऊन ही विटॅमिन  डी कमतरतेची  साथ संपवता येईल. यासाठी ६०,००० IU विटामीन डी दर आठवड्याला ८ आठवडे १२ वर्षा पुढील सर्वांनी घेण्यास हरकत नाही. या नंतर दर महिन्याला एकदा ६०,००० IU घ्यावे. विटॅमिन डी घेण्यास हरकत नाही विटॅमिन  डी घेताना रिकाम्या पोटी घेऊ नये. जेवणानंतर घ्यावे कारण ते चरबीत विरघळणारे विटॅमिन  असल्याने जेवणा सोबत शरीरात चांगल्या प्रकारे शोषून घेतले जाते. शक्य झाल्यास दर वाढदिवसाला आपल्या रक्तातील विटॅमिन  डी ची पातळी तपासून पहावी. तिचे प्रमाण पुढील प्रमाणे असते

अपेक्षित नॉर्मल पातळी – ५० – ६० नॅनो ग्रॅम प्रती मिलीलीटर ( ng / ml )

पातळी कमी / अपुरी  असणे – २० – ३० ng/ml तीव्र कमतरता – २० ng / ml पेक्षा कमी

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता