अनलॉक करताना कोरोना प्रतिबंधाची सूत्रे

अनलॉक करताना कोरोना प्रतिबंधाची सूत्रे

अनलॉक करताना कोरोना प्रतिबंधाची सूत्रे “लॉकडाऊन ५ हा मुळात लॉकडाऊनपेक्षा ही अनलॉक आहे. आता हळूहळू घरातून बाहेर पडणे, कामावर जाणे सुरु होणार आहे. लॉकडाऊन शिथिल झाला याचा अर्थ कोरोना संपला असा नाही. या अनलॉकसाठी बालरोगतज्ज्ञ डॉ. उपेंद्र किंजावाडेकर यांनी दशसूत्री सुचवली आहे. ही दशसूत्री अशी –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • तोंडाला मास्क व शक्य झाल्यास पर्समध्ये / खिशात सॅनिटायझर. आता आपण घराबाहेर पडतानाचा नियम असणार आहे.
  • अनलॉक करताना कोरोना प्रतिबंधाची सूत्रे मास्क नाही तर संभाषण नाही. मास्क न लावलेल्याशी संभाषण टाळावे. याचे कारण आपण मास्क लावलेला असेल आणि आपण ६ फुटांपेक्षा कमी अंतरावरून मास्क न लावलेल्याशी संभाषण करत असलो व जर ती व्यक्ती लक्षणविरहीत कोरोनाबाधित असेल तर तिच्यापासून आपल्याला संसर्गाचा धोका ७०% आहे. याउलट दोघांनीही मास्क लावलेला असल्यास ही शक्यता १.५ % इतकी खाली येते.
  •  आपल्याला आपले मित्र , नातेवाईक, आॅफिसमधील सहकारी भेटल्यावर छान गप्पा माराव्या वाटणार. पण काही दिवस तरी अवांतर गप्पा सोडून एकमेकांशी समोरासमोर मुद्द्याच बोलूया. अवांतर गप्पा मारायला घरी जाऊन हव तर फोनचा वापर करा पण समोरासमोर नको.
  •  एखाद्या सार्वजनिक ठिकाणी, बाजारात, दुकानात जात असाल आणि तिथे फिजिकल डिस्टन्सिंगच नियम धाब्यावर बसवले जात असतील इतरांना उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा स्वत: तिथून काढता पाय घेतलेला बरा.
  • डॉक्टर्स, डेंटिस्ट यांच्याकडे तातडीने जावे लागण्याची वेळ सोडून इतर वेळी वेळ घेऊन जावे. वकील, सीए अशा सर्व इतर व्यावसायिकांकडे शक्यतो वेळ घेऊनच जावे.
  • जमेल तिथे कुठेही आत जाताना व बाहेर आल्यावर, घरी परत येताना २० सेकंद हात धुण्याचा नियम विसरू नका.
  • शक्यतो जिन्याचा वापर करा कारण लिफ्टमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग अवघड आहे. फारच वरच्या मजल्यावर जायचे असल्यास व लिफ्ट वापरावीच लागणार असल्यास दोन ते तीन जणांनी आत शिरावे, प्रत्येकाने तीन कोपऱ्यात लिफ्टच्या भिंतीकडे तोंड करावे आणि बटन सोडून लिफ्टच्या कुठल्या ही गोष्टीला हात लावू नये.
  • बाहेरचे खाणे टाळण्यासाठी पाण्याची छोटी बाटली, लाडू, फळ, सुकामेवा आपल्यासोबत ठेवा.
  • सुरुवातीला २० ते ४० वयोगट, ज्यांना कोरोना संसर्ग झाला तरी धोका कमी आहे, अशा वयोगटाने कामासाठी बाहेर पडावे आणि नंतर इतरांनी महिनाभर परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावा.
  • किमान सार्वजनिक वाहतुकीत गर्दी कमी असल्यास मधली सीट रिकामी ठेवता येईल का, याचा विचार करावा. प्रवास करताना तरुण उभे राहिले तर हे शक्य होईल. १० वर्षांखालील, ६० वर्षांच्या वरच्या व्यक्ती बाहेर पडल्या नाही, ज्यांना शक्य आहे त्यांना घरूनच कामाची परवानगी मिळाली, अनावश्यक प्रवास टाळला तर सार्वजनिक वाहतुकीवर ताण कमी होईल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता