कोरोनासाठी तपासण्या करताना

कोरोनासाठी तपासण्या करताना...

कोरोनासाठी तपासण्या करताना कोरोनासाठी सध्या ४ प्रकारच्या तपासण्या अस्तित्वात आहे

आर टी – पीसी आर

कोरोनासाठी तपासण्या करताना सध्या आयसीएमार ने निश्चित निदाना साठी सांगितलेली टेस्ट म्हणजे आर टी – पीसी आर . ही टेस्ट कोरोना विषाणूच्या जनुकीय साहित्याला ओळखून नाक व घशातून घेतलेल्या स्वॅब मध्ये कोरोना सापडतोय का हे सांगते. या साठी स्वॅब फक्त नाकातून घेतल्यास अहवाल पाँजिटीव्ह येण्याची शक्यता ६३ % असते व घशातून घेतल्यास ३२ % असते. म्हणजे उर्वरित रुग्ण पाँजिटीव्ह असले तरी त्यांचा अहवाल निगेटिव येऊ शकतो. म्हणून स्वॅब हा नाक व तोंडातून दोन्ही ठिकाणाहून घेतला गेला पाहिजे म्हणजे पाँजिटीव्ह येण्याची शक्यता वाढते. तो घेत असताना डोळ्यातून पाणी यायला हवे इतका त्रास व्हायला हवा. म्हणजे रिपोर्ट नीट यावा असे वाटत असेल तर स्वॅब घेताना सहकार्य करा व स्वॅब घेणाऱ्याला माझी काळजी न करता तुमच्या पद्धतीने स्वॅब घ्या ही मोकळीक द्या.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

रॅपीड अँटीजीन टेस्ट 

ही नवी तपासणी असून कोरोना ची प्रथिने ओळखून यात विषाणू  निदान केले जाते. आरटी – पीसीआर प्रमाणेच ही टेस्ट ही नाक व घशातील स्वॅब मध्येच केली जाते. या टेस्ट चा फायदा असा आहे कि याचा अहवाल १५  मिनिटात येऊ शकतो. फक्त या टेस्ट ची समस्या अशी आहे कि ती कोरोनाचे निदान करण्याचे प्रमाण  आरटी – पीसीआर पेक्षा कमी आहे. म्हणजे जर या टेस्ट मध्ये रुग्ण पाँजिटीव्ह आला तर नक्कीच तो पाँजिटीव्ह ग्राह्य धरला जाऊ शकतो. पण निगेटिव आला तर एकदा आरटी – पीसीआर करून तो निगेटिवच आहे हे निश्चित करावे लागते.

ट्रुनॅट टेस्ट

अशा प्रकरची तपासणी आधी टी.बी व एच.आय.व्ही साठी वापरली जायची. या तपासणीत ही आरटी – पीसीआर प्रमाणे जनुकीय साहित्य ओळखण्याचे काम केले जाते. फरक इतकाच आहे कि हे काम मशीन द्वारे केले जाते व  मशीन खूप छोटे असते म्हणू ते कुठे ही वाहून नेता येते. तसेच निदानाचा अहवाल अर्ध्या तासात मिळू शकतो.

रॅपीड अँटीबॉडी टेस्ट

कोरोनासाठी तपासण्या करताना या तपासणी मध्ये प्रतिकारशक्ती दर्शवणारे अँटीबॉडी हे घटक मोजले जातात. पण या शरीरात ७ दिवसांनंतर निर्माण होतात. म्हणून या टेस्ट चे निदान करण्यामध्ये काहीही महत्व नाही. या अँटीबॉडी दोन प्रकारच्या असतात आयजी एम सात दिवसांनंतर पाँजिटीव्ह येते व आयजी जी १० ते १४ दिवसांनंतर तयार होते व पुढे अनेक दिवस शरीरात राहते. थोडक्यात आय जी एम पाँजिटीव्ह आल्यास नुकताच संसर्ग झाला आहे व आय जी जी पाँजिटीव्ह आल्यास आधी कधी तरी संसर्ग होऊन गेला आहे एवढेच कळते. ही चाचणी निदाना साठी नसून एखाद्या गावात , भागात , शहरात किती लोक आता संसर्गित झाले आहेत हे स्क्रीनिंग करून पुढील उपाय योजना ठरवण्यासाठी असते. ही चाचणी रक्तातून करता येते.

 इलायजा टेस्ट

 या टेस्ट मध्ये ही रॅपीड अँटीबॉडी टेस्ट सारखे अँटीबॉडीच तपासता येतात. सध्या भारतात फक्त आय जी जी मध्ये आधी होऊन गेलेल्या कोरोना चा संसर्ग तपासण्यासाठीच कीट उपलब्ध आहेत. म्हणून किती लोकसंख्या संसर्गित झाली आहे एवढेच ही तपासणी सांगते.

चाचणी आर. टी. पी. सी.आर रँपिड अँन्टीजीन ट्रुनॅट रँपिड  अँन्टीबॉडी इलायाजा
वापर निदान निदान निदान लोकसंख्येत संसर्गाचे प्रमाण तपासणे लोकसंख्येत संसर्गाचे प्रमाण तपासणे
किती वेळ लागतो २४ ते ४८ तास १५ मिनिटे १ तास ३० मिनिटे १ तास
कशी केली जाते घसा व नाकातील स्वब घसा व नाकातील स्वब घसा व नाकातील स्वब रक्त रक्त
किंमत रु. २८००/- रु. ४५०/- रु.१००० – १५००/- रु.६००/- निश्चित नाही

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.