कोरोना व्हायरस चे पँण्डेमिक म्हणजे नेमके काय?
कोरोना हा व्हायरस असून ज्याप्रमाणे सर्दी खोकला हा त्रास व्हायरसमुळे होतो तसाच कोरोना मुळे ताप, श्वास घेण्यास त्रास होणे असा श्वसन यंत्रणेचा त्रास होतो. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचे पँन्डेमीक जाहीर केले आहे. पँण्डेमिक म्हणजे नेमके काय तर जो आजार आंतरराष्ट्रीय सीमा पार करून इतर अनेक देशात कमी वेळात पसरतो त्याला पँण्डेमिक असे म्हटले जाते.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
कुठल्याही आजाराचे पँण्डेमिक जाहीर करण्यासाठी तीन मुख्य गोष्टी जबाबदार असतात. जो विषाणू नवा असतो, एकापेक्षा जास्त देशात कमी वेळात पसरतो , आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला याचा संसर्ग होतो तेव्हा पँण्डेमिक जाहीर केले जाते. कोरोना व्हायरस चे पँण्डेमिक जाहीर झाले याचा अर्थ एवढाच की हा आता जगभरात सर्व देशांमध्ये पसरण्याची दाट शक्यता आहे. पँन्डेमीक म्हणजे या आजारामुळे खूप जास्त मृत्यू होणार आहेत असे नाही. पण मात्र प्रतिबंध न केल्यास थोड्या कालावधीमध्ये लोकांना या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.
जागतिक आरोग्य संघटनेने एखाद्या आजाराचे पँण्डेमिक जाहीर करण्याचा हेतू हा इतर देशांना सतर्क करणे व ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक देशांमध्ये शासन व सर्वसामान्य लोकांच्या पातळीवर सतर्कता वाढवणे हा असतो
One Reply to “कोरोना व्हायरस चे पँण्डेमिक म्हणजे नेमके काय?”