मास्क हा विषय पुस्तकात लिहिण्यासारखा झालेला आहे. तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांनी मास्कवर पीएचडी करण्यासारखा विषय झालेला आहे. मास्क हा घटक आता कायमस्वरुपी मानवाच्या आयुष्यासोबत जोडला गेलेला आहे. त्यामुळे काही गोष्टी अशा ठेवा, तब्येतीशी निगडीत आणि कोविडच्या संदर्भात ज्याच्यामध्ये प्रयोग करायला जाऊ नका. यामध्ये एक विषय आहे, तो म्हणजे मास्क.
मास्क खरेदी करताना काय काळजी घ्यावी?
- मास्कचे लेयर तपासून घ्या.
- दोन ते तीन लेयरचे मास्क असावेत.
- नोज वायर मास्क ज्यावर एक स्टिलची पातळ पट्टी असते, जेणेकरुन मास्क नाकावर व्यवस्थित बसतो.
लहान मुलं किंवा मोठे व्यक्ती यांचा मास्क हा तीन लेयरचा असावा. कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी तीन लेयरचा मास्क हा गरजेचा आहे. लहान मुलांना चांगले शिकवले तर ते सेंसियर असतात. अगदी ६ ते ७ वर्षांच्या पुढची मुलं यांच्या मापाचे एन९५ मास्क अजून आलेले नाही, हे मोठं दुःख आहे. तर एन९५ या मास्कच्या नाकाला अडकवल्या जाणाऱ्या दोरीला गाठं मारली तर लहान मुलांना ते मास्क व्यवस्थित तोंडावर बसेल. कोरोनाची साथ पसरलेली असताना लहान मुलांना दोन एन९५ मास्क वापरले पाहिजे. तसेच कापडी मास्क वापरणार असाल तर त्यामध्ये तीन पदर असतील असे मास्क वापरणे.
किती प्रकारचे मास्क आहेत?
- कापडी मास्क
- सर्जिकल मास्क
- एन९५ मास्क
- एफएन९५ मास्क
सर्जिकल मास्क काय असतो?
- आरोग्य विभागाशी संबंधित क्षेत्रातल्या लोकांकडून अधिक वापर.
- कापडी मास्कच्या तुलनेत अधिक सुरक्षित.
- नोज वायर आणि अधिक लेयरवाले मास्क सुरक्षित
दरदिवशी ५० पेक्षा अधिक लोकांचा संपर्क होत असेल तर त्यांनी आधी सर्जिकल मास्क लावावा, आणि वरती एन९५ मास्क लावावा. अशा प्रकारे दोन मास्क लावले तर हे आदर्श असेल.
कोणते मास्क वापरू नयेत?
- जो मास्क चेहऱ्यावर व्यवस्थित बसणारा नसेल.
- श्वास घेताना त्रास होणाऱ्या विशिष्ट कपड्याचे मटेरियल वापरू नयेत.
- सिंगल लेयर मास्क टाळावा.
पदर, उपरणे, कपडे, रुमाल इत्यादी तोंडाभोवती बांधला तर तो मास्क झाला, असा खूप लोकांचा गैरसमज आहे. ग्रामीण भागातील ५० टक्के लोक अशा पध्दतीच्या मास्कचा वापर करताना दिसून येतात. मास्क लावल्यावर जीव गुदमरल्यासारखं ज्यांना वाटतं त्यांनी मास्क लावून ऑक्सिजनची पातळी चेक करा. ९७च्या पुढे ऑक्सिजन सॅच्यूरेशन राहत असेल, तर ही तुमची मानसिक समस्या असून शारीरिक समस्या नाही. मास्क हा सवयीचा भाग आहे. जेव्हा जेव्हा कोरोनाची लाट येईल, त्यावेळी एन९५ मास्क वापरणे गरजेचे आहे. कापडाचा मास्क वापरत असाल तर रोज एक सर्जिकल मास्क लावा. मग कापडाचा मास्क वापरा.
एन९५ हा सर्वसामान्यांना परवणारा नसेल तर गरिबातल्या गरीब माणसांने महिन्याला ५ एन९५ मास्क (एक एन९५ मास्कची बाजार किंमत २० रुपये) खरेदी करावे. स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर तुम्हाला महिन्याला १०० रुपये बाजूला काढणे आवश्यक आहे. आता हे पाच मास्क महिनाभर कसे वापरावे हे बघुया.
पाचही मास्कवर १ ते ५ नंबर टाकावे. एक मास्क वापरायला काढल्यावर जे चार मास्क वापरात नाही आहेत. ते उन्हामध्ये कपडे वाळवण्याचा चिमटा लावून वाळत घालावे. एक पूर्ण दिवस मास्क वापरून होईल, त्यानंतर दुसऱ्या नंबरचा मास्क वापरायला काढा. ७२ तासांमध्ये पहिल्या दिवशी वापरात काढलेला मास्कचे निजंर्तुकीकरण होते. मास्कची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना जाळलं गेलं पाहिजे. इतरत्र टाकलेले मास्क दिसतात हे अत्यंत चुकीचं आहे. याच्यातून संसर्ग वाढू शकतो. दुसरा पर्याय म्हणजे जमिनीत एक खोल खड्डा खणून मास्क पुरुन टाका.
७२ डिग्री सेंल्सियसच्या पुढे कोविड १९ हा विषाणू जिवंत राहत नाही. गरम पाण्यात मास्क टाकून धुवून पिळून सुकायला ठेवायचे. ब्रॅण्ड आणि हायफायच्या नादात मास्क खरेदी करून नका. तर आपण तीन पदरचा मास्क घरच्या घरी बनवू शकता. फिल्टरचे मास्क हे कुणीही वापरू नयेत. कारण फिल्टर मास्कमुळे स्वतः सुरक्षित राहता पण इतरांना बाधित करता. यात सर्वात जास्त धोका कुटुंबियांना होतो. मास्क हा फक्त स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नाही आहे तर समोरच्याही सुरक्षिततेसाठी आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने मास्कच्या किंमतींवर नियंत्रण आणलेले आहे. सर्जिकल किंवा एन९५ मास्क असू द्या, याच्या किंमती निर्धारित केलेल्या आहेत. तसेच त्या उपलब्ध देखील आहेत. मास्कची याच्यापेक्षा जास्त किंमत आढळून आली, तर तुम्ही जागृत ग्राहक राहून अन्न व औषध प्रशासनाला किंवा ग्राहक पंचायत यांना कळवले पाहिजे.
( खाली दिलेल्या युट्यूब चॅनेलच्या लिंकवर जावून व्हिडिओ सुध्दा पाहू शकता )