लहान मुले व गरोदर स्त्रीयांना माती खाण्याची सवय

बऱ्याच लहान मुलांना माती आणि इतर गोष्टी खाण्याची सवय असते. तर आज आपण पाहूया. या सवयीची कारणं, त्याचे दुष्परिणाम, उपचार आणि याबद्दलच्या गैर समजुती.

    बऱ्याच लहान मुलांमध्ये आणि गरोदर मातांमध्ये ही माती, खडू, पाठीवरची पेन्सिल, क्ले, प्लास्टर, खेळणी इत्यादी गोष्टी चाटण्याची सवय असते. या सवयीला वैद्यकीय भाषेमध्ये ‘पायका’ असं म्हणलं जातं. सगळ्यात आधी पाहूया या सवयीची कारणं काय असू शकतात. सगळ्यात महत्त्वाचे कारण असू शकतं ते म्हणजे शरीरात लोह (आर्यन) ची कमतरता. याच्या बरोबर थोड्या फार प्रमाणात झिंक आणि कॅल्शियमची कमतरता असते. मुख्य कमतरता ही लोहाची असते. ज्यामुळे आपल्याला माती खाण्याची किंवा इतर गोष्टी खाण्याची इच्छा होते.

Image Source – Internet

    दुसरे कारणं असतं मानसिक तणाव. जेव्हा मानसिक तणाव असतो. तेव्हा शरीराला आनंदायक घटकांची म्हणजेच सिरोटोनिन या केमिकलची गरज असते. हे केमिकल माती, खडू, पेन्सिल यांच्यामध्ये असतं. म्हणून माती किंवा इतर गोष्टी खाणारी व्यक्ती मानसिक तणावाखाली असते.

          माती खाल्ल्यामुळे मातीमधले जे जंत असतात ते पोटात जातात. त्यामुळे पोटात जंतू संसर्ग होतात. डायरियाचा त्रास होऊ शकतो. बऱ्याचवेळा खडू किंवा खडे आतड्यामध्ये अडकल्यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतो. काही वेळा ऑपरेशनची गरज पडू शकते. या गोष्टीमुळे जेवण कमी होतं. जेवण कमी झाल्याने इतर व्हिटामिन्स आणि घटकांची कमतरता भासू लागते. मग अजून भूक कमी होते. या सगळ्या दुष्परिणामामुळे या सवयीची तातडीने उपचार करण्याची गरज असते.

Image Source – ABP Majha – ABP News

    उपचार हे अत्यंत सोपे आहेत. तीन ते सहा महिने लोहाचं औषध घेतले पाहिजे. जर गरोदर स्त्रीया असतील, त्यांनी लोहाच्या गोळ्या घेतल्या पाहिजे आणि लहान मुले असतील तर त्यांनी लोहाचे टॉनिक घेतले पाहिजे. प्रति किलो ६ मिलीग्रॅम दररोज याप्रमाणात ते दिले जाऊ शकते. अधिक माती खाल्ल्यामुळे पोटात जंत झालेले असतात. जंताचं औषध रोज रात्री तीन दिवस घ्यायचं असतं. यागोष्टीसाठी मुलांच आणि आई-वडिलांचं समुपदेशन ही गरजेचे असतं. माती, खडू व पेन्सिल खाताना मुलांना पकडलं. तर त्याला रागावायचं नाही. त्याला प्रेमाने समजून सांगायचं.

    माती खाणं हे नॉर्मल असतं, असा या सवयीबद्दलचा मोठा गैरसमज आहे. खाण्याची माती ही बाजारात मिळते, असे काही पेशंट सांगतात. पण खाण्याची माती अशी गोष्ट अस्तित्वात नसते. ही सवय आरोग्याला अपायकारक आहे. त्याचा तातडीने उपचार करणं गरजेचे आहे. डॉक्टरांकडून सांगितले जाते की, कॅल्शियमची गरज असतं. पण खरंतर लोहाची गरज असते. माती खाण्याची सवय ही आपल्या देशात कित्येक लोकांना आहे. त्यामुळे त्वरित उपचार करा.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *