कोरोना विषयी सर्वसाधारण गैरसमज कोरोना माशांमुळे पसरतो – मध्यंतरी अमिताभ बच्चन यांनी विष्टेतून व माशांमुळे कोरोना पसरतो असे विधान केले होते. विष्टेत कोरोना आढळू शकतो पण तो या द्वारे पसरू शकतो हे अजून सिध्द झालेले नाही. तसेच माशांमुळे कोरोना पसरतो याला अजून शास्त्रीय आधार नाही. माशी इतरत्र कुठे कोरोना बाधित जागेवर बसेल व ती आपल्या त्वचेवर बसून त्यातून कोरोना होईल हे शक्य नाही. म्हणून कोरोना हा माशांमुळे पसरत नाही. इतर आजारांसाठी माशी वाहक ठरू शकते . म्हणून मात्र स्वच्छता ठेवणे व माशांचा रादुर्भाव रोखणे फायदेशीर असते.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
कोरोना डासांमुळे पसरतो – कोरोना शरीरात जाण्याचा मुख्य स्त्रोत हा कोरोना बाधित व्यक्ती कडून व काना तोंडातून श्वसन मार्गात जाण्याचाच आहे. डेंग्यू , मलेरिया प्रमाणे तो डासांच्या माध्यमातून पसरत नाही.टाळ्या वाजवल्याने हातावरचा कोरोना नाहीसा होतो – हात वाजवल्यावर १ ते १० khz इतकी कमी फ्रिक्वेन्सी निर्माण होते. विषाणू , बॅक्टेरीओया नष्ट करण्यासाठी ३० khz च्या पुढे फ्रिक्वेन्सी आवश्यक असते . म्हणून टाळ्या वाजवल्याने हातावरचा कोरोना नष्ट होणे शक्य नाही.घरगुती उपायांनी कोरोना पासून संरक्षण मिळेल – कुठले ही घरगुती औषध , नाकात तेल टाकणे , गरम पाणी पिणे याने कोरोना टाळणे शक्य नाही.
उपवास केल्याने कोरोना होणार नाही – उपवास केल्याने उलट शरीराची प्रतिकारशक्ती कमी होईल. म्हणून या काळात कोणीही उपवास करू नये. चांगला आहार घ्यावा.
कोरोना विषयी सर्वसाधारण गैरसमज भारतातील उष्ण हवामाना मुळे आपल्याला कोरोना होणार नाही. – ५६ डिग्री च्या पुढे पाणी उकळल्याने कोरोना नष्ट होतो पण बाहेरचे तापमान जास्त आहे किंवा उष्ण हवामान आहे म्हणून कोरोना नष्ट होईल असे नाही. भारतीयांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने भारतीयांना कोरोना होणार नाही – परदेशात राहणाऱ्या भारतीयांना ही कोरोना ची बाधा झाली आहे. भारतीय वेगळे आहेत व त्यांना कोरोना होणार नाही किंवा कमी प्रमाणात होईल असे मानण्यास सध्या काही शास्त्रीय अडह्र नाही .
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता