भीती घालवण्यासाठी वापरा रेन टेक्निक कोरोनाची मनातील भीती कमी करण्यासाठी भावनिक व्यवस्थापन तज्ञ डॉ. संदीप केळकर पुढील रेन टेक्निक सुचवतात.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
- A…Accept, Approve – स्वीकारणे
- R…Recognize – म्हणजे ओळखणे
- I….Investigate – पडताळणी करणे
- N..Non attachment – भावना स्वीकारून त्या पासून स्वतःला वेगळे करणे
R..recognize – भावना ओळखा
ह्या संकटामध्ये कोरोना विषयी मी कुठल्या भावना अनुभवत आहे. भीती, नैराश्य, काळजी, चिंता. आपण अनुभवत असलेल्या भावनेला ओळखून आपण नाव देऊ शकलो तर त्याचा सामना करणे खूप सोपे जाते असे दिसून आले आहे.
A..Accept – स्वीकार करा
भावनांना दडपलं तर त्या आपल्याला दुप्पट वेगाने गिळंकृत करतात आणि दुर्लक्ष केलं तर, त्या चुंबाकासारख्या तुम्हाला खेचून घेतात. म्हणून त्यांचा योग्य वेळीच स्वीकार करा. अशा भावना मनात येणे हे स्वाभाविक आहे हे स्वीकारा. अशा प्रकारे स्वीकार केल्याने त्याची तीव्रता कमी करता येते.
I..Investigate – पडताळणी करा
ही भावना मला काय सांगायचा प्रयत्न करते आहे? मला काय संदेश देत आहे? ह्याची पडताळणी करा. संदेश ओळखला तर भावनेची तीव्रता कमी होण्यास मदत होइल.
N..Non Attachment
भीती घालवण्यासाठी वापरा रेन टेक्निक म्हणजेच… या भावना म्हणजे मी नाही. ती माझ्या मनात परिस्थिती मुळे उमटणारी एक तात्कालिक भावना आहे. आधी मी अनुभवलेल्या नकारत्मक भावना कायमच्या टिकल्या नाहीत. म्हणून या ही टिकणार नाहीत. म्हणून ही भावना म्हणजे कायमचा मी नाही. एकदा अशा प्रकारे भावनेकडे निर्लेप, तटस्थ आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने बघितले कि ती भावना नियंत्रित करण्यास सोपे जाते व भावनांशी मैत्री करता येते. यापुढे जाऊन या चार पायर्यांमधून प्रत्येक भावनेचे विश्लेषण केले कि आपण त्यासाठी मदत घेण्यास ही तयार होतो, इतरांना त्या सहज बोलून दाखवू शकतो. कोरोना विषयी भीती, तणाव , नैराश्य अशा कुठल्या ही भावना मनात येत असतील तर कागद पेन घेऊन वरील चार पायर्यांवर त्यांचे स्वतःच विश्लेषण करा.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता