घरात थांबा, उगीच बेड आडवू नका सध्या जनतेकडून दोन मोठ्या चुका होत आहेत ज्या टाळल्या पाहिजे
रिपोर्ट येई पर्यंत बाहेर फिरणे व कामावर जाणे –
आर टी पीसीआर चा रिपोर्ट येण्यास दोन व काही ठिकाणी चार दिवस लागत आहेत. काही ठिकाणी रॅपीड अँटीजीन टेस्ट सुरु झाली आहे व ती निगेटिव्ह आली तर आर टी पीसीआर टेस्ट केली जाते व तुम्ही निगेटिव्ह असल्याचे निश्चित होण्यास थोडा अवधी लागतो. बर्याच ठिकाणी रुग्णाची तब्येत चांगली असेल तर रीपोर्ट येई पर्यंत रुग्णाला दाखल केले जात नाहीत. अशा वेळी आपण निगेटिव्ह आहोत असे गृहीत धरून काही जन घरा बाहेर पडणे , आपली कामे करत राहणे असे करत आहेत. पण यामुळे इतरांना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच रिपोर्ट येई पर्यंत घराबाहेर न पडता घरीच वेगळ्या खोलीत घरातील सदस्यांपासून लांब राहणे गरजेचे आहे . रिपोर्ट येई पर्यंत आपण पॉजिटीव्ह आहोत असे गृहीत धरावे व पुढील गोष्टी कराव्या –
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
- संबंधित आरोग्य अधिकार्यांना संपर्क करून आपल्याला दाखल होण्याची गरज आहे का याची चाचपणी करावी.
- होम आयसोलेशनचा सल्ला दिला असल्यास रोज दोन वेळा स्वतःचे ऑक्सिजन , श्वासाची गती तपासावी.
- रोज दोन वेळा ६ मिनिट वॉक टेस्ट करावी.
- रिपोर्ट निगेटिव्ह आला पण डॉक्टरांना लक्षणांना वरून तरी ही कोरोनाच वाटत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्या प्रमाणे घरातच थांबावे . आरोग्य अधिकारी व डॉक्टर दुसऱ्या टेस्ट विषयी निर्णय घेतील.
उगीचच बेड आडवून ठेऊ नका –
घरात थांबा, उगीच बेड आडवू नका बरेच रुग्ण तब्येत चांगली असताना व निर्देशा प्रमाणे सुट्टीची तारिक असली तरी रुग्णालयात दाखल राहात आहेत. यात इन्श्युरन्स असलेले व १४ दिवसांपेक्षा जास्त दिवस दाखल राहणारे श्रीमंत रुग्ण ही आहेत. पण अनेक गंभीर रुग्णांना बेड मिळत नसताना अशा प्रकारे बेड अडवून गरज नसताना दाखल राहणे योग्य नाही. तसेच तब्येत चांगली असताना उगीचच दाखल राहून रुग्णालयातून इतर संसर्गाचा धोका ही असतोच . म्हणून सुट्टी कधी घ्यायची ही गोष्ट इंश्युरंस आहे का ? नातेवाईक व रुग्णाची काळजी यावर ठरवण्यापेक्षा डॉक्टरांना ठरवू द्या
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.