कोरोना साथीत लैंगिक संबंधांचे काय? कोरोना साथीच्या काळात नव विवाहित दाम्पत्यांपासून ते इतर सर्वच जोडप्यांना लैंगिक संबंध ठेवण्याविषयी अनेक प्रश्न पडले आहेत. एका अभ्यासात विर्या मध्ये कोरोनाचे विषाणू सापडल्याचे आढळून आले पण विर्यातून मात्र लैंगिक संबंधांनंतर कोरोनाचा प्रसार होत नाही असे सिद्ध झाले. कोरोना बाधित स्त्रियांमध्ये योनीतील स्वॅब मध्ये मात्र कोरोनाचे विषाणू आढळून आले नाही. असे असले तरी कोरोनाग्रस्त व्यक्ती व संपर्कात असल्यास पुढील मार्गदर्शक तत्वे सांगता येतील –
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
- विर्यातून संसर्ग होत नसला तरी लैंगिक संबंधात जवळचा संपर्क येत असल्याने निदान झाल्यापासून १४ दिवस व शक्य असल्यास महिना भर शारीरक संबंध टाळावे.
- निदान होण्याच्या आठवडा भर आधी जर इतर कोणाशी लैंगिक संबंध ठेवले असतील तर ती व्यक्ती ही हाय रिस्क कॉनटॅक्ट म्हणजे जोखीम जास्त असलेली व जवळून संपर्क आलेली व्यक्ती ठरते. अशा व्यक्तीने चौदा दिवस स्वतःला क्वारंटाइन करावे व पुढील चौदा दिवस,म्हणजे निदान झाल्यापासून शक्य असल्यास महिना भर लैंगिक संबंध टाळावे.
- कोरोना बाधित व्यक्तीशी थेट संपर्कात आलेल्यांनी लैंगिक संबंध चौदा दिवस टाळावे.
- कोरोना साथीत लैंगिक संबंधांचे काय? इतर सर्व जणांनी म्हणजे ज्यांचा कोरोनाशी संपर्क आलेला नाही अशांनी लैंगिक संबंध ठेवण्यास हरकत नाही.
- जर जोडप्या पैकी कोणीही कामा साठी बाहेर जात असल्यास लैंगिक संबंध ठेवण्यास हरकत नाही.
- नव विवाहित दाम्पत्यांसाठी वधू किंवा वरापैकी कोणीही हॉट स्पॉट असलेल्या शहरातून आलेले असल्यास किंवा कन्टेनमेंट झोन मधून आले असल्यास १४ दिवस संयम ठेवावा व त्यानंतर लैंगिक संबंध सुरु करावे.
- साथीच्या काळात देहविक्रय करणार्यांशी लैंगिक संबंध किंवा पूर्वइतिहास किंवा कुठली ही माहिती नसलेल्याशी लैंगिक संबंध हे कोरोनाच्या संसर्गाची शक्यता वाढवणारे ठरू शकते.
- कोरोना मुळे लैंगिक क्षमते वर व प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो असा गैरसमज व अफवा पसरली आहे. हा गैरसमज असून असा कुठला ही परिणाम कोरोना मुळे होत नाही.
- साथीच्या काळात व जास्त वेळ घरात राहावे लागते अशा नैसर्गिक आपत्तीं मध्ये संतती नियमनाच्या साधनां कडे दुर्लक्ष होते व अशा संकटांनंतर अनियोजित गर्भधारणेचे प्रमाण वाढते म्हणून या काळात संतीती नियमना कडे विशेष लक्ष असू द्यावे.
- कोरोनाचा संसर्ग झाला असण्याच्या आणू लक्षणे दिसल्याच्या चार ते पाच दिवसांच्या विंडो पिरोड मध्ये लैंगिक संबंधांतून गर्भधारणा झाली असल्यास गर्भ पाडण्याची गरज नाही. या गोष्टीचा अर्भकावर कुठला ही परिणाम होणार नाही.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता