संसर्गानंतरच्या उलट्या-जुलाब

संसर्गानंतरच्या उलट्या-जुलाब

संसर्गानंतरच्या उलट्या-जुलाब ‘कोरोना’चे बरेच रुग्ण हे जुलाब व उलट्या हे पहिले लक्षण घेऊनही येत आहेत; पण हे उलट्या-जुलाब कसे असतात हे आपल्याला माहीत असले पाहिजे. साधारणत: उलट्या या जेवल्यावर किंवा पोटात काहीतरी अन्न असताना होतात. पण कोरोनामध्ये मात्र पोटात अन्न नसतानाही उलट्या होऊ शकतात. तसेच, सकाळी उठल्या वर ही लगेच उलट्या होऊ शकतात. जुलाब हे दोन प्रकारचे असतात. पहिला ज्याचा उगम छोट्या आतड्यांमध्ये अन्न न पचल्याने होतो. हे छोट्या आतड्यांच्या कार्यातील बिघाडामुळे होणारे जुलाब पाण्यासारखे, कुठल्याही प्रयत्नाशिवाय अपोआप होणारे व रक्त किंवा शेम नसलेले असतात. जे जुलाब पाण्यासारखे नसतात, घट्ट असतात, जुलाब होताना दुखते आणि शेम पडते, असे जुलाब मोठ्या आतड्याची कार्यक्षमता घटल्यामुळे होतात. शक्यतो कोरोनासारख्या व्हायरसचा परिणाम छोट्या आतड्यांवर होतो व बॅक्टेरियाचा परिणाम हा मोठ्या आतड्यांवर होतो. म्हणून कोरोनामुळे पाण्यासारखे पातळ, वेदना न होता, शेम नसलेले जुलाब होतात. हे जुलाब पातळ असले तर कोलेरासारखे एकाच वेळी जास्त प्रमाणात होत नसून त्या मानाने कमी प्रमाणात असतात. दिवसातून ४ ते ५ वेळा होतात आणि ५ ते ७ दिवस चालतात. यासोबत ताप, पोटदुखी, डोकेदुखी ही लक्षणेही असतात. बऱ्याचदा श्वासाशी निगडित लक्षणे जुलाब असलेल्या रुग्णांमध्ये उशिरा येतात. जुलाब कोरोना सोडून इतर कारणांमुळेही असू शकतात व कोरोना रुग्णाचा संपर्क जुलाब कोरोनामुळे आहेत का, याची शहानिशा करण्यास महत्त्वाचे ठरते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

जुलाब असल्यास

  • आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.
  • संसर्गानंतरच्या उलट्या-जुलाब शौचालय भरपूर पाण्याचा वापर करून स्वच्छ ठेवावे.
  • दिवसातून एकदा शौचालयात ब्लिचिंग सोल्यूशन किंवा सोडियम हायपोक्लोराइटयुक्त पाणी टाकावे.
    शौचालयाच्या नळावर व दाराचे हँडल दिवसातून काहीवेळा सॅनिटायजर स्प्रे मारून पुसून घ्यावे.
  • कमोड वापरत असल्यास शौचालयाचे झाकण फ्लश केल्यावर बंद करावे.
  • एक लिटर पाणी, सहा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ टाकून हे पाणी तहान लागेल तसे वारंवार प्यावे व दिवसातून दोन ते तीन वेळा नारळाचे पाणी प्यावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

सर्दी-खोकला-ताप म्हणजे कोरोना नाही

सर्दी खोकला ताप म्हणजे कोरोना नाही

सर्दी-खोकला-ताप म्हणजे कोरोना नाही

सर्दी खोकला किंवा इतर कुठल्याही कारणाने ताप आला तर कोरोनामुळे आहे का अशी भीती आपल्याला प्रत्येकाला वाटणे सहाजिक आहे. पण कोरोनाची मुख्य लक्षणे समजून घेतल्यास लक्षात येईल की साधा सर्दी-खोकला म्हणजे कोरोना नाही.

प्रत्येक सर्दी-खोकला-ताप म्हणजे कोरोना नाही

कोरोना व्हायरस (COVID-19) ची मुख्य लक्षणे –

कोरडा खोकला, तीव्र स्वरुपाचा ताप त्यानंतर दोन किंवा तीन दिवसांनी श्वास घेण्यास त्रास . यासोबत 1 जानेवारी नंतर कोरोनाग्रस्त देशांमध्ये प्रवास किंवा सध्या भारतातील कोरोनाचे निदान निश्चित झालेल्या रुग्णांची संबंध हा रिस्क फॅक्टर महत्त्वाचा आहे. ताप आणि खोकला  इतर कारणांनी असू शकतो. पण कोरोनाग्रस्तांशी संबंध आल्यास व ही लक्षणे असल्यास मात्र आपण सरकारी यंत्रणेशी तपासणी साठी संपर्क साधायला हवा. अंगदुखी ही कोरोनामध्ये कमी प्रमाणात सर्दी खोकला, फ्लू मध्ये जास्त प्रमाणात असतात तसेच शिंका येणे, नाक गळणे, जुलाब हे कोरोनामध्ये नसते पण  सर्दी खोकला व फ्लू मध्ये असते.

सर्दी-खोकला-ताप म्हणजे कोरोना नाही
कोरोना व इतर आजारांमधील फरक

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना व्हायरसची सविस्तर लक्षणे – कोरोनाची तीव्र ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास हा आपल्याला माहित आहे. पण हा त्रास तीव्र किंवा गंभीर कोरोनाच्या रुग्णालाच होतो. ८५ टक्के लोकांना कोरोना संसर्ग झाला तरी एक तर साधा ताप आणि थोडा खोकला असा सौम्य स्वरुपाची लक्षण दिसतील. त्यातही काहींना असे ही होऊ शकते की काहीच लक्षणे आली नाहीत. म्हणून साधा खोकला, ताप, सर्दी असली तरी आपल्याला इतरांपासून लांब रहायचे आहे हे समजून घ्यावे.

COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी? कारण कोरोना व्हायरस शी लढताना आपले सगळ्यात मोठे हत्यार असणार आहे आपली प्रतिकारशक्ती. त्यातच ६० वर्षावरील ज्येष्ठ आणि मधुमेह असणाऱ्यांनी प्रतिकारशक्ती वाढवण्याची विशेष काळजी घ्यायला हवी. COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी? यासाठी काही टिप्स.

कोरोना प्रतिबंध आणि शासन कोरोना संदर्भात स्वच्छतेच्या मुलभूत नियमांचा आता पुरेसा प्रचार झाला आहे. शासन आता जितक्या आक्रमकपणे आणि विचारपूर्वक साथ नियंत्रणाचे, प्रतिबंधाचे काम करील तेवढे नुकसान कमी होईल. ‘घाबरू नका’ असे सांगताना शासनाकडून ठोस कृती होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

https://www.youtube.com/playlist?list=PL9bO6h-fFoNgMdrfWBGtXtP0uLD3KC5yl
Dr. Amol Annadate’s Videos on Prevention and Cure of CORONAVIRUS Disease COVID-19

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.