ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना काही ठिकाणी ऑनलाईन खाण्याचे पदार्थ विक्री करणारे अॅप्स सुरु झाले आहेत. काही काळा नंतर इतरत्र ते सुरु होतील. शक्य असल्यास पुढील काही महिने बाहेरून व ऑनलाईन खाद्य पदार्थ मागवणे टाळावे. जेवणातून कोरोनाचा संसर्ग होत नाही. पण वस्तूच्या माध्यमातून होऊ शकतो. म्हणून असे ऑनलाईन मागवलेल्या खाद्य पदार्थ स्वीकारताना कोरोना पासून बचाव करण्यासाठी पुढील काळजी घ्यावी –
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
- डिलिवरी देणाऱ्या व्यक्ती कडून थेट खाद्य पदार्थाचे पॅकेज स्वीकारण्यापेक्षा त्याला ते बाहेरच ठेवून जायला सांगावे.
- पैसे देताना शक्यतो डिजिटल पेमेंट ला प्राधान्य द्यावे.
- शक्य असेल तर पॅकेज घरात आणूच नये. प्लास्टिक चे साधे ग्लव्ज घालावे.
- त्यावर थोडे सॅनीटायजर ओतावे.
- ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना एका वाइप किंवा कपड्यावर टाकून सॅनीटायजरने पॅकेज बाहेरून स्वच्छ करून घ्यावा. हे करत असताना आतील अन्नाचा सॅनीटायजरशी संपर्क येणार नाही हयाची काळजी घ्यावी.
- गवळ्या कडून दुध घेतो तसे दारातच खाद्यपदार्थ घरच्या भांड्यात / ताटात काढून घ्यावे.
- ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना पॅकेज व नंतर ग्लव्ज घरा बाहेरच डस्टबिन मध्ये वेगळ्या प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून टाकावे. यामुळे नंतर हे स्वच्छ करणाऱ्याला ही याचा धोका राहणार नाही. तसेच ते आपण सॅनीटायजरने स्वच्छ ही केले आहे.
- सगळे झाल्यावर हात साबण व पाण्यान धुवून घ्यावे.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता